Worli Crime News : मुंबईच्या स्पा सेंटरमध्ये 'गजनी'चा मर्डर; 'टॅटू' ठरला खुन्यांचा कर्दनकाळ

Mumbai Crime News : मुंबईतील वरळी स्पा सेंटर हत्या प्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. गजनी चित्रपटासारखंच मृत गुरुसिदप्पाने शरीरावर टॅटूने आपल्या शत्रूंची नावं कोरली होती. त्यातून या हत्येचा थरार उलगडला आहे.
Worli Crime News
Worli Crime NewsSaam Digital
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबईतील वरळी स्पा सेंटर हत्या प्रकरणी नवा खुलासा समोर आलाय. अगदी गजनी चित्रपटासारखंच मृत गुरुसिदप्पाने शरीरावर टॅटूने आपल्या शत्रूंची नावं कोरली होती. त्यातून या हत्येचा थरार उलगडला आहे. त्यावरचा हा रिपोर्ट....

तुम्ही गजनी चित्रपट पाहिला असेल. त्यात अमीर खान आपल्या शत्रूंची नावं शरीरावर गोंदून ठेवतो. अगदी तशीच घटना मुंबईतील वरळीत घडलीय. गुरुसिद्दप्पा वाघमारे या मृतानं आपल्या शरीरावर काढलेल्या टॅट्यूतून हत्येचा पट उलगडलाय...

सॉफ्ट टच स्पा सेंटरवर 50 वर्षीय गुरुसिद्दप्पा वाघमारे आणि त्याची 21 वर्षीय गर्लफ्रेंड पोहचतात...स्पा सेंटरवर दोघ बराच वेळ घालवतात, त्यानंतर स्पा सेंटरवर दोन अज्ञात व्यक्ती धारदार शस्त्रांसह येतात...गुरुसिद्दपाच्या गर्लफ्रेंडला दुसऱ्या खोलीत नेलं जातं...त्यानंतर गुरुसिद्दप्पावर सपासप वार करुन त्याची हत्या केली जाते...दुसऱ्या दिवशी पोलिसांना या घटनेची माहिती गर्लफ्रेंड देते...त्यानंतर गुरुसिदप्पाचं पोस्ट मार्टम केलं जातं...यावेळी उलगडते या मर्डरची गजनी स्टाईल मिस्ट्री...

'गजनी' गुरुसिदप्पाची मर्डर मिस्ट्री

मृत गुरुसिदप्पाच्या शरीरावर 22 टॅटू

मांडीवर कोरली शत्रूंची नावं

जीवास बरं वाईट झाल्यास जबाबदार लोकांचा मांडीवरील नावात उल्लेख

टॅटूत सुपारी देणाऱ्या शेरेकर, फिरोजचंही नाव

CCTV तपासात फिरोज आढळला

चौकशीत शेरेकर आणि शकीलची नावं उघड

Worli Crime News
Paris Olympics 2024 : पृथ्वीवर कधी परतणार माहिती नाही! पण अंतराळात भरवलं मिनी ऑलिम्पिक; सुनिता विल्यम्स काय करतेय? पाहा VIDEO

गजनी गुरुसिद्दपाची मर्डर मिस्ट्री एवढ्यावरचं संपत नाही. गुरु 2014 पासून स्पा मालकाकडून खंडणीही वसूल करायचा..याचाच उल्लेख गुरुसिद्दप्पाच्या डायरीत पोलिसांना आढळला...गुरुच्या तगाद्याला कंटाळूनच त्याच्या हत्येची सुपारी दिली गेल्याच्या निष्कर्षावर पोलीस पोहचले...त्यानंतर स्पा मालक संतोष शेरेकरसह पाच जणांना पोलिसांनी अटक केलीये..एखाद्या चित्रपटाचं कथानक होईल किंवा अगदी वेबसिरीजसाठी शोभेल अशीच गुरुसिद्दपाची कहाणी..मात्र गुरुसिद्दपाच्या डायरीतून अजुन बरंच गुढ उलगडणार आहे.

Worli Crime News
Paris Olympics 2024 : टोकियो हुकलं, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये थेट फायनलमध्ये धडक; मनू भाकरचं मेडल निश्चित?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com