Paris Olympics 2024 : टोकियो हुकलं, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये थेट फायनलमध्ये धडक; मनू भाकरचं मेडल निश्चित?

Manu Bhaker/10 Meter Air Pistol : टोकीयो ऑलिम्पिकमध्ये अंतिमफेरीत पिस्टलमध्ये बिघाड झाल्यामुळे मनू भाकरचं मेडल हुकलं होतं. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्टल प्रकारता तीने अंतिमफेरी गाठली आहे.
Paris Olympics 2024
Paris Olympics 2024Saam Digital
Published On

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी चांगली बातमी आहे. भाताच्या नेमबाजांनी पहिल्याच दिवशी मेडलच्या आशा जागवल्या आहेत. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. मनू भाकर 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत एकूण 580 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भाकरने पहिल्या फेरीत 97, दुसऱ्यामध्ये 97, तिसऱ्यामध्ये 98, चौथ्यामध्ये 96, पाचव्यामध्ये 96 आणि सहाव्या फेरीत 96 गुण मिळवले. मनू भाकरचा अंतिम सामना उद्या म्हणजेच २८ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता होणार आहे.

मनू भाकरसाठी टोकियोमधील नेमबाजी स्पर्धेची अंतिम फेरी खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित ठरली होती. मेडल मिळण्याची खात्री असतानाच तिच्या पिस्टलमध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाला आणि ती अंतिमफेरीत पोहोचू शकली नाही. तिच्यासाठी आणि भारतासाठी ही खूपच धक्कादायक बाब होती. या प्रकारानंतर तिला अश्रू रोखता आले नव्हते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिने चांगली कामगिरी करत आणि अंतिम फेरी गाठली आहे.

मनू भाकर 10 मीटर एअर पिस्टप प्रकारातील भारताची प्रसिद्ध नेमबाज आहे. तिने आतापर्यंत 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 18 फेब्रुवारी 2002 रोजी हरियाणातील झज्जरमध्ये तिचा जन्म झाला आहे. लहानपणापासूनच तिला नेमबाजीत रस होता आणि तिने अप्रतिम कामगिरी करत विश्वास सार्थ ठरवला आहे.

Paris Olympics 2024
Paris Olympic 2024 : पहिल्याच दिवशी भारतीय उघडणार पदकाचं खातं? दावेदार कोण अन् कसं आहे वेळापत्रक?

तिने अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथे झालेल्या 2018 युवा ऑलिंपिक गेम्समध्ये 10 मीटर एअर पिस्तट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. तर ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकांसह अनेक पदके मिळवली आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमबाजम्हणू प्रसिद्धी मिळवली आहे. तिने आशियाई खेळांमध्येही पदक जिंकली असून नेमबाजीत भारतासाठी मोठं योगदान राहिलं आहे. देशांतर्गत अनेक राष्ट्रीय स्पर्धा तिने जिंकल्या आहेत आणि विविध नेमबाजी स्पर्धांमध्ये विक्रम प्रस्थापित केले आहेत.

Paris Olympics 2024
Paris Olympics Opening Ceremony Live : सीन नदीच्या तिरावर लेडी गागाचा परफॉर्मन्स, हजारो चाहत्यांची उपस्थिती; जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याची खास वैशिष्ट्ये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com