Pune Dengue Cases: पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यूचे ३८९ संशयित रुग्ण, झिका व्हायरस, चिकुनगुनियाचेही पेशंट वाढले

Pune Dengue Cases: शहरामध्ये चिकुगुनिया आणि झिकाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पालिका प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Pune Dengue Cases: पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यूचे ३८९ संशयित रुग्ण, झिका व्हायरस, चिकुनगुनियाचेही पेशंट वाढले
Zika VirusSaam TV
Published On

सागर आव्हाड, पुणे|ता. २८ जुलै २०२४

एकीकडे पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर पुणे शहरात आता साथीच्या रोगांनी डोकेदुखी वाढवली आहे. शहरामध्ये चिकुगुनिया आणि झिकाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पालिका प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Pune Dengue Cases: पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यूचे ३८९ संशयित रुग्ण, झिका व्हायरस, चिकुनगुनियाचेही पेशंट वाढले
Pune Dam Water Level : खुशखबर! पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; वाचा ताजी आकडेवारी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पावसाळ्यानंतर पुणे शहरांमध्ये साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. शहरात चिकुगुनिया आणि झिकाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. पुण्यामध्ये डेंग्यूचे 389 संशयित रुग्ण आळढून आले आहेत तर झिका रुग्णांची रुग्णसंख्या ३७ वर पोहोचली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासून डेंग्यू रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

झिका विषाणू हा मुख्यतः एडीस डासांद्वारे प्रसारित होणाऱया विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून एकात्मिक कीटक व्यवस्थापनअंतर्गत एडीस डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच पालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Pune Dengue Cases: पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यूचे ३८९ संशयित रुग्ण, झिका व्हायरस, चिकुनगुनियाचेही पेशंट वाढले
Pune Crime News: 'मी IAS अधिकारी, नादाला लागू नको', धमकी देत पैसे उकळले, पुण्यातील तरुणीचा प्रताप, अवैध सावकारीचा गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्येही डेंग्यूची साथ..

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातील महापालिका आरोग्य केंद्र, मिनी घाटी, घाटी आणि खाजगी रुग्णालयांच्या बाह्य रुग्णांमध्ये रोज सुमारे 14 हजार रुग्ण येतात. त्यांपैकी 6 हजार रुग्ण हे तापाचे असल्याची माहिती खाजगी डॉक्टरांनी दिली आहे. धक्कादायक बाप म्हणजे त्यातील 900 जणांना डेंगु ची लक्षणे आहे मात्र यातील फक्त केवळ 15 ते 20 नमुन्यांचे अहवाल हे मनपाच्या आरोग्य विभागाकडे येतात.

मागील आठवड्यात डेंगूसदृश्य आजारामुळेदोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला त्यानंतरही खाजगी आणि प्रशासकीय पातळीवर याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक डॉक्टर आणि खाजगी पॅथॉलॉजी लॅब मध्ये तपासण्या करून उपचार देतात. त्यामुळे खऱ्या डेंग्यूच्या रुग्णांचा आकडाच समोर येत नसल्याने सध्या सुरू असलेली मनपाची मोहीम फक्त हवेतच आखल्याची चर्चा सुरू आहे.

Pune Dengue Cases: पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यूचे ३८९ संशयित रुग्ण, झिका व्हायरस, चिकुनगुनियाचेही पेशंट वाढले
Maharashtra Politics : मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः तडीपार; शरद पवारांचा अमित शहांना टोला, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com