Pune Dam Water Level : खुशखबर! पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Water Levels in Pune District Dams : गेल्या ४८ तासांत पुण्यात विक्रमी पाऊस झालाय. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
खुशखबर! पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; वाचा ताजी आकडेवारी
Water Levels in Pune District DamsSaam TV
Published On

संपूर्ण जून महिन्यात पुणे जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुणे शहरासह परिसराला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. गेल्या ४८ तासांत पुण्यात विक्रमी पाऊस झालाय. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे शहरावरील पाणीसंकट टळलं असून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.

खुशखबर! पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; वाचा ताजी आकडेवारी
Weather Forecast : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना आज पाऊस झोडणार, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्या ४८ तासांत एकूण २१.७७ टीएमसी पाणी जमा झाले आहे. यापैकी खडकवासला प्रकल्पातील ४ धरणांमध्ये फक्त दोन दिवसात १.८२ टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा हा ११४.९३ टीएमसी इतका झाला आहे.

दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठ्याचे प्रमाण ५७.९४ टक्के इतकं झालं आहे. पुणे जिल्ह्यात टाटा समुहाची ६ धरणं वगळता एकूण २६ धरणे आहेत. या धरणाची एकूण पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी इतकी आहे. यामध्ये पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ‘खडकवासला’ प्रकल्पांत टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या ४ धरणांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांमधील एकूण पाणीसाठा आता २३.४९ टीएमसी इतका झाला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात चारही धऱणांमध्ये केवळ १९.९८ टीएमसी (६८.५१ टक्के) इतका पाणीसाठा होता. खडकवासला धरणात आतापर्यंत ८०.५७ टक्के इतका पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचं टेन्शन मिटलं आहे.

दरम्यान, पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण ९४ टक्के इतकं भरलं आहे. परिस्थितीनुसार कधीही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, कुणीही नदीपात्रात उतरू नये, असं आवाहान जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

खुशखबर! पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; वाचा ताजी आकडेवारी
Weather Alert : महाराष्ट्रात आजही मुसळधार पाऊस, 'या' भागात मेघगर्जनेसह कोसळणार; IMD कडून ऑरेंज अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com