Deputy Chief Minister Eknath Shinde  Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विरोधात बसू पण शिवसेना फुटू देणार नाही, शिंदेसेनेतील दिग्गज नेत्याचं मोठं विधान

Pratap Sarnaik Big Statement: 'प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही', असं सूचक विधान राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळाच चर्चा होऊ लागल्या आहेत.

Priya More

Summary -

  • प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेत फूट पडू देणार नाही, असा निर्धार केला

  • सत्ता महत्त्वाची असली तरी पक्षाची एकजूट अधिक महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले

  • निवडणुकांनंतर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर त्यांनी टीका केली

  • एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अखंड आणि सशक्त असल्याचा दावा केला

बालाजी सुरवसे, धाराशिव

'प्रसंगी विरोधात बसू,पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही', असं मोठं विधान शिंदेसेनेतील वरिष्ठ नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेंना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न प्रताप सरनाईकांनी केला आहे. 'सत्ता महत्त्वाची असली, तरी पक्षाची एकजुट त्याहुन महत्वाची आहे. त्यामुळे प्रसंगी विरोधी बाकांवर बसू पण शिवसेनेत फुट पडू देणार नाही.', असे मत प्रताप सरनाईकांनी व्यक्त केले.

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. या चर्चांना पूर्णविराम देत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली. 'सत्ता महत्त्वाची असली तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही.', असं प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे.

प्रताप सरनाईक यांनी यावेळी आरोप करताना सांगितले की, 'नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र लढवल्या होत्या. त्यामुळे पुढेही एकत्रित सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच, काही मंडळींकडून माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेरल्या जात आहेत. स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही.', असा इशारा त्यांनी दिली.

यावेळी त्यांनी असेही सांगितले की, 'आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे. कोणत्याही अफवांना आम्ही बळी पडणार नाही.' तसंच, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये मी स्वत: मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून पुढील राजकीय रणनीती ठरवणार आहे.', असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात

High blood pressure: कसं ओळखाल की तुमचा रक्तदाब वाढलाय?

परवेझनं अल्पवयीन हिंदू मुलीला जाळ्यात अडकवलं,८ मित्रांना अश्लील व्हिडिओ पाठवला; खेडामध्येही अमरावतीसारखा कांड

Death News: प्रसिद्ध निर्मात्यावर दु:खाचा डोंगर; अक्षय तृतीयादिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन

SCROLL FOR NEXT