Maharashtra Politics: राज्यात शिंदेंची ताकद आणखी वाढली, मनसे अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; अनेक बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

MNS and NCP leaders join Shiv Sena Shinde Faction: शिवसेना शिंदेगटाची राज्यात ताकद आणखी वाढली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला मोठा धक्का दिला. अनेक बड्या नेत्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.
Maharashtra Politics:  राज्यात शिंदेंची ताकद आणखी वाढली, मनसे अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; अनेक बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Deputy CM Eknath Shinde Saam Tv
Published On

Summary -

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राज्यात ताकद वाढली

  • उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला

  • मनसे आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला

  • नांदेड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद आणखी वाढली आहे. अनेक राज्यभरातील इतर राजकीय पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आणि मनसे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये धनुष्यबाण हाती घेतले. तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये बिलोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक लक्ष्मण शेटटीवार, माजी उपाध्यक्ष आनंद गुडमलवार, माजी नगराध्यक्ष देवंण्णा तोंदरोड, चक्रधर पाटील, साईनाथ हंगरगे, नामदेव पाटील देगावकर, वकील अंकुशराजे जाधव, जेजेराव शिंदे, शहाजी बाबरे, सुरेश येलबुगडे, डॉ.सुनील जाधव, सतीश धाने, विठ्ठल कोकणे यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Maharashtra Politics:  राज्यात शिंदेंची ताकद आणखी वाढली, मनसे अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; अनेक बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics: महाविकास आघाडी फुटली? राज्यसभेवरून घडी विस्कटली, मविआतील विसंवादाचं कारण आहे काय?

तर, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील सडे गावचे सरपंच आणि माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य धीरज पानसंबळ यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बालाजी पाटील खतगावकर, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे राज्यात शिवसेनेला बळकटी मिळाली असून शिंदेसेनेची स्थानिक पातळीवर ताकद आणखी वाढली आहे. याचा फायदा शिंदेसेनेला आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics:  राज्यात शिंदेंची ताकद आणखी वाढली, मनसे अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; अनेक बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics: काँग्रेस-हिंदुत्ववादी रस्त्यावर भिडले; काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला,राजकारणाचा कल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com