एसटी डेपोत 'मद्यधुंद' कारभार; रेस्ट रूममध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या, मंत्री प्रताप सरनाईक संतापले अन्...

Transport Minister Pratap Sarnaik : मुंबईतील परळ एसटी डेपोमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अचानक पाहणीत रेस्ट रूममध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या.

liquor bottles found in ST depot rest room Mumbai Parel : मुंबईतील परळ एसटी डेपोमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान डेपोच्या विश्रांती कक्षात (रेस्ट रूम) दारूच्या बाटल्या सापडल्या. त्याशिवाय एक चालक मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने मंत्री प्रताप सरनाईक यांचा पारा चढला. या गंभीर प्रकारानंतर त्यांनी संबंधित चालकाला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे परळ डेपोतील सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी चालक-वाहकांच्या विश्रांती कक्षात त्यांना १० ते १२ दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. इतकेच नव्हे तर कर्तव्यावर असलेला एक चालक मद्यधुंद अवस्थेत सापडल्याने मंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. "आम्ही सभागृहात चालक-वाहकांच्या हक्कांसाठी आणि सुविधांसाठी भांडतो, आणि इथे असा प्रकार सुरू आहे? हे खपवून घेतले जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com