MPSC Student Saam Tv
महाराष्ट्र

MPSC Student: MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; निवड न झालेल्यांनाही मिळणार संधी

Government Opens New Career Path for MPSC Candidates: राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पण निवड न झालेल्यांनाही संधी मिळणार आहे.

Priya More
  • एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे

  • एमपीएससीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या पण निवड न झालेल्या उमेदवारांसाठी सरकारचा मोठा निर्णय

  • ‘निपुण सेतू’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे

  • महाराष्ट्र सरकारने ‘निपुण सेतू पोर्टल’ विकसित करण्यास मंजुरी दिली

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने निपुण सेतू उपक्रमाला मंजुरी दिली आहे. एमपीएससीच्या गुणवंत पण अंतिम निवडीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांचे टेन्शन दूर झाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांना मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात. या कठीण परीक्षेत अनेक विद्यार्थी पास होतात. अंतिम टप्प्यापर्यंत ते जातात पण शेवटी निवड प्रक्रियेपासून ते वंचित राहतात. शासनाकडे उपलब्ध असलेली पदसंख्या मर्यादित असल्यामुळे केवळ काही उमेदवारांचीच अंतिम शिफारस होते. यामुळे आवश्यक शैक्षणिक पात्रता, नेतृत्वगुण आणि प्रशासकीय कौशल्य असूनही मोठ्या संख्येने गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत नाही.

अशाच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अशा सक्षम उमेदवारांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा लाभ राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी करून घेण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. १३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्या नियमानुसार, उद्योग विभागांतर्गत 'निपुण सेतू' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यास आणि त्यासाठी स्वतंत्र 'निपुण सेतू पोर्टल' विकसित करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे.

'निपुण सेतू' उपक्रम काय आहे?

उद्योग विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या 'एक खिडकी मैत्री २.०' (MAITRI 2.0) पोर्टल अंतर्गत 'निपुण सेतू' हे नवीन पोर्टल विकसित केले जाणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या पण अत्यंत कमी गुणांनी अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या, खासगी उद्योजक, शासकीय महामंडळे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. जेणेकरून या कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार मनुष्यबळ मिळू शकेल.

पोर्टलवर उमेदवारांचे कोणते तपशील उपलब्ध असतील?

खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नियोक्त्यांना योग्य उमेदवाराची निवड करता यावी यासाठी खालील मर्यादित आणि आवश्यक माहितीच पोर्टलवर दिली जाईल:

1. उमेदवाराचे पूर्ण नाव आणि जन्मवर्ष.

2. शैक्षणिक पात्रता ( यामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा विशेष प्राविण्य)

3. पूर्व कामाचा अनुभव (असल्यास).

4. संबंधित परीक्षेचे नाव आणि अंतिम टप्प्यात मिळालेले गुण.

5. संपर्क तपशील: उमेदवाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर पूर्णपणे सुरक्षित ठेवला जाईल. तो फक्त अधिकृत आणि नोंदणीकृत नियोक्त्यांनाच (Employers) पाहता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमावली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT