Success Story: जिद्द, मेहनत आणि चिकाटीची कहाणी! जैनवाडीच्या मनोजकुमार जमदाडे यांची MPSC मध्ये दमदार झेप

Success Story: जैनवाडीच्या मनोजकुमार जमदाडे यांनी कठोर परिश्रमातून राज्यसेवेत यश मिळवले आहे. नायब तहसीलदार ते सहायक राज्यकर आयुक्त पदापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या.
Success Story
Success StorySaam tv
Published On

अक्षय गुंड, साम टिव्ही

Success Story: पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी या छोट्याशा गावातून आलेल्या मनोजकुमार जमदाडे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर राज्यसेवा परीक्षेत यश मिळवत सहायक राज्यकर आयुक्त पदावर झेप घेतली आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या या तरुणाने नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अभ्यास यांचा समतोल साधत हे यश संपादन केले आहे. त्यामुळे त्यांची ही यशोगाथा आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

मनोजकुमार यांचे बालपण संघर्षमय होते. आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अशा परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. लहानपणापासूनच “आई-वडिलांना चांगले दिवस दाखवायचे” हा निर्धार त्यांच्या मनात होता. याच प्रेरणेतून अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी जोपासले.

Success Story
Riteish Deshmukh: 'महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान खपवून घेणार नाही', धीरेंद्र शास्त्रींना रितेश देशमुखांनी सुनावले खडेबोल

शैक्षणिक वाटचालीत त्यांनी गणित विषयात एम.एस्सी. पूर्ण केले आणि पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. याच काळात त्यांनी NET परीक्षा उत्तीर्ण केली. गावकऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्याला नवे वळण मिळाले.

Success Story
Aamir Khan: अमिर खानसोबत नेमकं काय घडलं? हमसून रडला, शर्टाने पुसले डोळे, VIDEO व्हायरल

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. मात्र त्यांनी सातत्य राखत अभ्यासाची दिशा निश्चित केली. कोविड-१९ काळात परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या गेल्या, तरीही त्यांनी हार मानली नाही. ५० ते ६० सराव प्रश्नपत्रिका सोडवत त्यांनी स्वतःला सतत तयार ठेवले.

या प्रवासात अपयशही आले. काही परीक्षांमध्ये कमी गुणांनी अपयश मिळाले, पण कुटुंबाचा आधार आणि स्वतःवरील विश्वास यांच्या जोरावर त्यांनी पुन्हा उभारी घेतली. सध्या नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असतानाही त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि वेळेचे काटेकोर नियोजन केले. त्यांच्या यशामागे कुटुंब, मित्र आणि मार्गदर्शकांचा मोठा वाटा आहे. निवडीची बातमी मिळाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आईला ही आनंदवार्ता दिली. न्यूनगंड बाळगू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. संघर्ष कठीण असला तरी यश निश्चित मिळते. असा मोलाचा सल्ला मनोजकुमार जमदाडे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com