कॉलेज-कोचिंगचं साटलोटं, विद्यार्थ्यांची लूट, पुण्यात 'इंटिग्रेटेड'च्या नावाखाली काळाबाजार

NEET JEE Preparation Scam Investigation Report: आता बातमी आहे साम टीव्हीनं केलेल्या इन्व्हेस्टीगेशनची.... NEET आणि JEEच्या नावाखाली कॉलेज आणि खासगी कोचिंग क्लासेसमध्ये पालकांच्या लुटीचं मोठं रॅकेट राज्यात सुरू आहे. या रॅकेटचा साम टीव्हीच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झालाय. कुठे आणि कसं सुरू आहे हे रॅकेट? सामनं केलेल्या ऑपरेशन कॉलेज-कोचिंगवरचा हा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट...
“Students trapped in expensive integrated coaching programs as Pune racket exposes massive education fraud”
“Students trapped in expensive integrated coaching programs as Pune racket exposes massive education fraud”Saam tv
Published On

सध्या संपूर्ण देशात 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरण चांगलंच गाजतंय. पैशांच्या मोहापायी प्राध्यापकांनी शिक्षणासारख्या पवित्र पेशाशी बेईमानी करत लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचं पाप केलं. या प्रकरणातील आरोपी सध्या जेलची हवा खातायत. पण, याच 'नीट' प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेला आतून पोखरून काढणारं आणखी एक भयानक वास्तव चव्हाट्यावर आलंय. राज्यातली अनेक ज्युनिअर कॉलेजेस आणि खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'इंटिग्रेटेड टाय अपच्या नावाखाली पालकांची कोट्यवधी रुपयांना लूट सुरू आहे. साम टीव्हीच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. या स्टिंगमधून काय समोर आलंय पाहूयात....

दहावी संपली की आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनीअर बनवण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी पालक नको नको ते करण्याची तयारी दाखवतात. पालकांच्या याच भावनेचा गैरफायदा पुण्यात गल्लीबोळातील खाजगी क्लासेसनी घेतलाय...पालकांच्या लुटीचं हे इंटिग्रेटेड टाय अप नेमकं काय आहे? पाहूयात...

कॉलेज-कोचिंगचं इंटिग्रेटेड टाय-अप

विद्यार्थी वर्षभर कॉलेजची पायरीही चढत नाही. ज्या क्लासचे कॉलेजशी टायअप आहे, त्यांच्या यादीनुसार कॉलेजच्या हजेरीपटावर अंतर्गत 'सेटिंग' करून विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के दाखवली जाते.

विद्यार्थ्यांना कॉलेजच्या हसत्या-खेळत्या वातावरणापासून दूर ठेवून, सकाळी ८ ते रात्री ८ अशा क्लासच्या कोंदट खोल्यांमध्ये फॅक्टरीतील कामगारांसारखे अभ्यासाला जुंपले जाते

क़ॉलेज आणि क्लासेसमध्ये सुरू असलेल्या या इंटिग्रेटेड पॅर्टनसाठी पालकांकडून लाखो रुपये घेतले जातात. कोणत्या परीक्षेसाठी नेमके किती लाख आकारले जातात ते पाहूयात....

कॉलेज-कोचिंगमधील इंटिग्रेटेड पॅटर्नचे दर

केवळ नीट-जेईई कोचिंग

वार्षिक खर्च-

1 लाख 20 हजार ते 1 लाख ८० हजार

2 वर्षांचा खर्च -

2 लाख 40 हजार ते 3 लाख 60 हजार

कॉलेज-कोचिंगमधील इंटिग्रेटेड पॅटर्नचे दर

इंटिग्रेटेड पॅटर्न (कॉलेज क्लास टायअप)

वार्षिक खर्च -

2 लाख 50 हजार ते 3 लाख 50 हजार

2 वर्षांचा खर्च -

5 लाख ते 7 लाख रुपये

अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात 75 टक्के हजेरी सक्तीची आहे. मात्र, या नियमाला सर्रास बगल दिली जातेय... त्यामुळे इंटिग्रेटेड टाय अप बंद करून कॉलेजवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेनं केलीय....

ज्युनिअर कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस यांच्यातील छुप्या 'इंटिग्रेटेड'ला चाप लावून या रॅकेट मुळापासून उद्धवस्त करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात कॉलेजेस केवळ शोभेच्या इमारती ठरतील आणि इंटिग्रेटेडच्या नावाखाली सुरू झालेली कोचिंगची कीड शिक्षण व्यवस्था आणि तरुणांचं आय़ुष्य बरबाद केल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com