काका मला वाचवा, अचानक शिंदे मोदींच्या भेटीला, शिवसेनेचा वाद मोदींच्या कोर्टात?

Eknath Shinde Meets PM Modi Amid Shiv Sena Case Hearing: शिवसेना नेमकी कुणाचा? यावरून सुप्रीम कोर्टात नेमका काय फैसाला होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलयं...मात्र कोर्टाचा निकाल येण्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानं शिवसेनेचा वाद मोदींच्या कोर्टात गेल्याची चर्चा रंगलीय... नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या रिपोर्टमधून...
Eknath Shinde meets PM Narendra Modi in Delhi amid Shiv Sena dispute hearing in Supreme Court.
Eknath Shinde meets PM Narendra Modi in Delhi amid Shiv Sena dispute hearing in Supreme Court.saam tv
Published On

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक झालेल्या दिल्लीवारीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंमध्ये दिल्लीत तब्बल १ तास बंद दाराआड चर्चा रंगली. गेल्या अवघ्या ५ महिन्यांत शिंदेंनी पंतप्रधान मोदींची घेतलेली ही भेट केवळ सदिच्छा भेट नाही कारण एका बाजूला सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या भवितव्याचा फैसला ठरणारी अंतिम सुनावणी सुरू असताना, शिंदेंनी खासदारांना घेऊन मोदींचं दार ठोठावलंय. या भेटीत नेमकं काय घडलं ऐका एकनाथ शिंदें काय म्हणतायेत...

एकीकडे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून कपिल सिब्बलांनी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गटाची नाकेबंदी सुरू केली असतानाच, ही भेट झाल्यानं ठाकरे गटानं शिंदेंवर काका मला वाचवा म्हणत टिका केलीये. तर शिंदे मुख्यमंत्र्यांची तक्रार करायला दिल्लीत धावलेत," असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावलाय.

राजकीय आरोप प्रत्यारोप जरी झाले असले तरी गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींच्या अनेक चर्चांचे बॉम्ब दिल्ली आणि महाराष्ट्रात फुटलेत.

देवेंद्र फडणवीस राज्यातून दिल्लीत जाण्याच्या चर्चा

मोदींच्या केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होण्याच्या चर्चा

विस्तारात शिंदेंच्या सेनेला 2 मंत्रीपदं मिळणार असल्याची चर्चा

ठाकरेंचे 6 खासदार फोडल्यानंतर पहिली भेट

लवकरच शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल लागणार

शिंदेसेनेच्या नेत्यांनी दिपकेंच्या भेटीमुळे भाजप नाराज

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता, आणि फडणवीसांनी तातडीने दिल्ली दौराही केला होता. त्यातच, ठाकरेंचे ६ खासदार फोडून एनडीएतील तिसरा मोठा घटकपक्ष बनलेल्या शिंदे सेनेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात २ मंत्रीपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण या सगळ्या राजकीय गणितांमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी आणि दुसरं म्हणजे, अभिजित दिपके यांची शिंदे सेनेच्या नेत्यांनी घेतलेली भेट. या भेटीमुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व शिंदे गटावर चांगलंच नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिल्यानंतर ही नाराजी दूर करण्यासाठीच भेट झाल्याचे कयासही लावले जातायेत.

या सर्व राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी मोदींची भेट घेतली असतांना शिंदेंनी नेहमीप्रमाणे गुगली टाकली...

शिंदेंनी मोदींनी पारावारीक चर्चेचा दाखला देत राजकीय चर्चा झाल्याच्या मुद्याला बगल दिली असली तरी राजकारणात कोणतीच भेट ही विनाकारण होत नसते. जगातील सर्वात व्यस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जर शिंदेंना 1 तास भेटून चर्चा करत असतील तर तिथे फक्त कौटुंबिक गप्पा किंवा हवामानाची चर्चा नक्कीच झाली नसेल. या बंद दाराआड झालेल्या तासाभराच्या चर्चेची इनसाईड स्टोरी येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये शोधावी लागेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com