mahesh landge vs ajit gavhane Bhosari Vidhan Sabha Exit Poll 
महाराष्ट्र

Bhosari Exit Poll : भोसरीचा आमदार कोण? एक्झिट पोलमध्ये भाजपला जोरदार धक्का!

Bhosari Vidhan Sabha Exit Poll : भोसरीमध्ये कोण आमदार होणार? एक्झिट पोलमध्ये भाजपला धक्का, वाचा काय सांगतोय कौल? (Maharashtra vidhan Sabha Election Exit Polls)

Namdeo Kumbhar

mahesh landge vs ajit gavhane Bhosari Vidhan Sabha Exit Poll : भोसरी मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पारडे जड दिसत आहे. भोसरीमध्ये भाजप उमेदवार आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात चुरशीची लढत झाली.शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र स्वरूपाच्या मतदारसंघात शरद पवारांची जादू चालल्याचे दिसत आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील एक्झिट पोलचे आकडे शरद पवार यांच्या बाजूने झुकल्याचे दिसतेय. साम टीव्हीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भोसरीमध्ये आमदार बदलण्याची शक्यता आहे. महेश लांडगे (भाजप) विरुद्ध अजित गव्हाणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांच्यातील लढतीकडे पुणेकरांचे लक्ष लागले होते. भोसरीमध्ये तुतारीचा आवाज घुमेल असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंख्या

एकूण मतदार - 6 लाख 8 हजार 425

पुरुष मतदार - 3 लाख 28 हजार 280

महिला मतदार - 2 लाख 80 हजार 48

तृतीयपंथीय मतदार - 97

उमेदवारांची संख्या - 11

मतदान केंद्र संख्या - 492

ईव्हीएम मशीन संख्या -590

निवडणूक कर्मचारी संख्या - 2861

भोसरीमध्ये शरद पवार गटाचे पारडे जड मानले जातेय. भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांना शरद पवार यांच्या विरुद्ध अजित गव्हाणे यांच्याकडून आव्हान होतं. या मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाल्याचं दिसतेय. भोसरीकरांनी शरद पवार यांच्या राष्ट्रावादीला साथ दिल्याचे दिसतेय.

भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे विजयी होतील, असा अंदाज आहे. महेश लांडगे यांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याचा दिसत आहे. भाजपच्या नाराज नगरसेवकाचा फटका बसत असल्याचे दिसतेय. अजित गव्हाणे हे कधीकाळी अजित पवार यांच्या पक्षात होते, पण निवडणुकीच्या आधी पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. भोसरीमधून तिकीट मिळावे, त्यामुळे गव्हाणे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन मिळाले होते. अजित गव्हाणे यांना नगरसेवकांनी विधानसभेला मोठी मदत केल्याचं दिसतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईला बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवताना पाहिलं; मुलीचा गळा आवळून विहिरीत फेकलं, कलयुगी आईचा प्रताप

Virar Building Collapse: विरारमध्ये 40 वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला अन् पुढे काय घडल? VIDEO

Dhule Accident : भीषण अपघात; ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने ट्रक अनियंत्रित, दोघांचा मृत्यू

Russia- Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; टार्गेटवर कीवमधील मंत्री, कॅबिनेट इमारतीतून उठले धुरांचे लोट

Lalbaugcha Raja Viral Video : लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सुरक्षारक्षकांचा मुजोरीपणा, बाप लेकीला ढकलले आणि...

SCROLL FOR NEXT