Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

Indapur Vidhan Sabha Exit Poll 2024 : इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? विधानसभा लागल्यानंतर याची चर्चा पुण्यात सुरु होती. याचं उत्तर एक्झिट पोलमधून मिळालेय. (Maharashtra vidhan Sabha Election Exit Polls)
Indapur Harshvardhan patil vs datta bharane Maharashtra vidhan Sabha Election Exit Polls
Indapur Harshvardhan patil vs datta bharane Maharashtra vidhan Sabha Election Exit Polls Indapur Harshvardhan patil vs datta bharane Maharashtra vidhan Sabha Election Exit Polls
Published On

Indapur Harshvardhan patil vs datta bharane Maharashtra vidhan Sabha Election Exit Polls : इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तुल्यबळ लढत झाल्याचं दिसतेय. माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी निवडणुकीत उडी घेतल्यामुळे या लढतीकडे पुणेकरांचे लक्ष लागलेय. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांना झटका बसण्याची शक्यता आहे.

इंदापूरमधील प्रतिष्ठेच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होतं. ऐन विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करत तुतारी फुंकली होती. हर्षवर्धन पाटील यांना तिकीट दिल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षातील नाराजांनी बंड पुकारला होता. या बंडाचा फटका हर्षवर्धन पाटील यांना बसेल, असं सांगण्यात येत होतं. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, हर्षवर्धन पाटील यांचा विजय होण्याची शक्यता आहे. इंदापरमध्ये शरद पवार गटाचे पारडे जड असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Indapur Harshvardhan patil vs datta bharane Maharashtra vidhan Sabha Election Exit Polls
Maharashtra Exit Polls : राम शिंदे पराभवाचा वचपा काढणार की रोहित पवार पुन्हा आमदार होणार? एक्झिट पोल काय सांगतो?

इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांना जोरदार धक्का -

पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होती. या लढतीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला. हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे व अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्यामध्येही लढत झाली. शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सभा घेतल्या होत्या. त्याचबरोबर या मतदारसंघात दहा वर्षापासून सत्तेच्या बाहेर असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी ताकद पणाला लावली होती. आप्पासाहेब जगदाळे यांनी दत्तात्रय भरणे यांना साथ दिल्यामुळे पाटलांना फटका बसेल, असं सांगण्यात येत होतं. पण इंदापूरच्या जनतेनं हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने कौल दिल्याचं दिसतेय. दोन मराठा उमेदवार एक ओबीसी उमेदवार अशी लढत इंदापूरमध्ये झाली.

Indapur Harshvardhan patil vs datta bharane Maharashtra vidhan Sabha Election Exit Polls
Maharashtra Exit Polls : शरद पवार की अजित पवार, पिंपरीकरांचा कौल कुणाला? संभाव्य आमदाराचे नाव स्पष्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com