Maharashtra Exit Polls : राम शिंदे पराभवाचा वचपा काढणार की रोहित पवार पुन्हा आमदार होणार? एक्झिट पोल काय सांगतो?

Karjat Jamkhed Sabha Exit Poll 2024 : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? कर्जतची जनता कुणाला कौल देणार? वाचा एक्झिट पोलचा अंदाज
Ram Shinde vs Rohit Pawar, Karjat Jamkhed vidhan Sabha Exit Poll
Ram Shinde vs Rohit Pawar, Karjat Jamkhed vidhan Sabha Exit PollRam Shinde vs Rohit Pawar, Karjat Jamkhed vidhan Sabha Exit Poll
Published On

Ram Shinde vs Rohit Pawar, Karjat Jamkhed vidhan Sabha Exit Poll 2024 : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघाचा समावेश आहे. विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यासमोर माजी आमदार राम शिंदे यांचं आव्हान असेल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत झाली होती, यावेळीही या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलेय. रोहित पवार पुन्हा आमदार होणार का? राम शिंदे पराभवाचा वचपा काढणार का? याकडे राज्याचे लक्ष लागलेय. त्याआधीच कर्जत जामखेडचा एक्झिट पोल (Saam TV Exit Poll) समोर आलाय.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड मतदारसंघात हाय होल्टेज लढतीत रोहित पवार यांचं पारडं जड मानले जातेय. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, रोहित पवार पुन्हा एकदा विधानसभेला जाण्याची शक्यता आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार जायंट किलर ठरले होते. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राम शिंदे यांच्या विजयाच्या शक्यता कमी दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, रोहित पवार पुन्हा एकदा आमदार होण्याची शक्यता आहे.

Ram Shinde vs Rohit Pawar, Karjat Jamkhed vidhan Sabha Exit Poll
Maharashtra Exit Polls : शरद पवार की अजित पवार, पिंपरीकरांचा कौल कुणाला? संभाव्य आमदाराचे नाव स्पष्ट

कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांनी २०१९ मध्ये राम शिंदे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला होता. २०२४ विधानसभेला राम शिंदे यांच्याकडून रोहित पवारांना तगडी फाइट देण्यात आली. पण एक्झिट पोलचे आकडे रोहित पवार यांच्या बाजूने झुकल्याचे दिसतेय. २३ तारखेला कर्जत जामखेडचं चित्र स्पष्ट होईल.

Ram Shinde vs Rohit Pawar, Karjat Jamkhed vidhan Sabha Exit Poll
Maharashtra Election : निकालाआधी मविआच्या घडामोडींना वेग, मातोश्रीवर तातडीची बैठक, Inside Story साम टीव्हीकडे

राम शिंदे यांनी मागील पाच वर्षात कमबॅक करण्यासाठी जोरदार तयारी केली. प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याही सभा झाल्या. गड राखण्यासाठी राम शिंदे यांनी मोठी तयारी केली. पण त्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.

Ram Shinde vs Rohit Pawar, Karjat Jamkhed vidhan Sabha Exit Poll
Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

2019 च्या विधानसभेला कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार पहिल्यांदाच रिंगणात उतरले होते. त्यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत विजयी सुरुवात केलेली. २०१९ विधानसभेला राम शिंदे यांना 92 हजार 477 मते पडली होती. तर रोहित पवार यांनी 1 लाख 35 हजार 824 मते मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com