Pimpri Assembly Constituency Election 2024 : पुण्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये तगडी फाइट झाली, यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड असल्याचं दिसतेय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आण्णा बनसोडे यांच्या विजयाची शक्यता जास्त असल्याचं एक्झिट पोलच्या (Saam Exit Poll) आकड्यावरुन दिसत आहे.
विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर पिपंरीमध्ये आमदार कोण होणार? याची पुण्यात चर्चा सुरु झाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुलक्षणा शिलवंत मैदानात होत्या. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आण्णा बनसोडे यांच्यासमोर शिलवंत यांचं तगडं आव्हान होतं. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार, पिंपरीकर आण्णा बनसोडे यांच्या मागे उभे असल्याचं दिसत आहे. आण्णा बनसोडे यांच्या विजयाची शक्यता जास्त असल्याचे एक्झिट पोलच्या आकड्यावरुन दिसत आहे. आण्णा बनसोडे पिंपरीमधील सध्या विद्यमान आमदार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभी फूट पडल्यानंतर आण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. जागा वाटप झालं ,त्यावेळी अजित पवार यांनी पिंपरीमध्ये आण्णा बनसोडे यांच्यावरच विश्वास दाखवला. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार, पिंपरीकरांनी आण्णा बनसोडे यांच्या पारड्यात मते टाकली आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार आण्णा बनसोडे पिंपरीची संभाव्य आमदार असतील.
पिंपरीकरांनी आण्णा बनसोडे यांना मतं दिल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसतेय. पिंपरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड राहिल असा अंदाज आहे.
पिपंरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत झाली आहे. आण्णा बनसोडे तिसऱ्यांदा रिंगणात उतरल्या होत्या. सुलक्षणा शिलवंत आणि आण्णा बनसोडे यांच्यात काटें की टक्कर झाली. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, आण्णा बनसोडे यांचे पारडे जड दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.