Tiger Attack
Tiger Attack Saam tv
महाराष्ट्र

Tiger Attack : मोहफूल घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला; महिलेचा मृत्यू

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : शेतशिवार परिसरात मोहफूल घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. (Tiger) वाघाच्या हल्ल्यात ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) कन्हाळगाव परिसरात घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घाबरत पसरली आहे. (Maharashtra News)

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कन्हाळगाव येथील सीताबाई दडमल (वय ६०) ही महिला गावाशेजारी असलेल्या शेतात सकाळी मोहफुल संकलन करण्यासाठी गेली होती. सकाळपासून गेलेली सीताबाई दुपार होऊन देखील घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेले.  शेतात जाऊन पाहिले असता (Tiger Attack) वाघाने तिच्यावर हल्ला करत जागीच ठार केले होते. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असुन नागरिकांनी एकच गर्दी केली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सदर घटनेमुळे कन्हाळगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत पोलीस प्रशासन तसेच (Forest Department) वन विभागाला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच वन विभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा; अशी मागणी आता गावकरी करू लागले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Tips: रोज फक्त १०मिनिटे करा योगा, तणाव होईल दूर

Kartiki Gaikwad: 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाड झाली आई; सोशल मीडियावर शेअर केली गूड न्यूज

Today's Marathi News Live : होर्डिंग दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा १५ वर

Nashik Lok Sabha 2024: नाशिकमध्ये आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; ५ व्या टप्प्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे अन् PM मोदींची सभा

Rajasthan News: भयंकर! साखळी तुटल्याने लिफ्ट १८०० फूट खोल खाणीत कोसळली; १४ जण अडकले, बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT