जळगाव : धुळवड असल्याने सकाळपासून मित्रांसोबत रंगांची उधळण करत एकमेकांना रंग लावल्याचा आनंद घेतला. (Jalgaon) परंतु हा आनंद दुपारनंतर दुःखाच्या खाईत लोटला गेले. रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून (Death) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हि घटना धरणगाव तालुक्यातील जांभोरे गावाजवळ घडली. (Tajya Batmya)
धरणगावातील (Dharangaon) लोहार गल्लीतील जितेंद्र माळी (वय २०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. जितेंद्र हा आपल्या सर्व मित्रांसोबत सकाळी रंगपंचमी खेळण्यासाठी गेला होता. सकाळी धूलिवंदन खेळल्यानंतर जितेंद्र तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा गावालगत असलेल्या तलावावर पोहण्यास गेला. पोहत असताना जितेंद्र पाण्यात बुडायला लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जितेंद्रच्या मित्रांनी याबाबत गावात माहिती दिली. यानंतर ग्रामस्थ तळाजवळ पोहचले. साधारण तीन- चार तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह तलावातून काढण्यात आला. दरम्यान, धूळवाडीच्याच दिवशी मुलाचा मृत्यू झाल्याने आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. धरणगाव पोलिसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.