Pune Cyber Crime : पुण्यातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक; कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची दाखविली भीती

Pune News : मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी कार्यालयात हजर व्हावे लागेल. बँक खात्याची पडताळणी होईपर्यंत तुमच्या बॅंकेतील रक्कम सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे चोरट्यांनी सांगितले
Pune Cyber Crime
Pune Cyber CrimeSaam tv
Published On

सचिन जाधव 
पुणे
: परदेशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ तसेच परदेशी चलन सापडल्याची भीती दाखवून (Cyber Crime) सायबर चोरट्यांनी बाणेर परिसरातील एका डॉक्टरची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम डॉक्टराकडून लाटली. या प्रकरणी सायबर पोलिसात (Cyber Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

Pune Cyber Crime
Buldhana News : निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याने IAS अधिकाऱ्याची बदली, नातेवाईक व समर्थकांची तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी

पुण्यातील (Pune) शिवाजीनगर भागातील क्लिनिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. सायबर चोरट्यांनी १ मार्चला डॉक्टरच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. तुम्ही मुंबईहून तैवानला कुरिअरद्वारे पाठवलेले पार्सल कंपनीने परत पाठविले आहे. (Mumbai) मुंबई विमानतळावर पार्सल जप्त केले आहे. त्यात पाच पासपोर्ट, तीन क्रेडिट कार्ड, अमली पदार्थ मेफेड्रोन, परदेशी चलन आणि लॅपटॉप आहे. मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी कार्यालयात हजर व्हावे लागेल. बँक (Bank) खात्याची पडताळणी होईपर्यंत तुमच्या बॅंकेतील रक्कम सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे चोरट्यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Cyber Crime
Washim News : दुचाकीवर कारवाईचा बडगा; वाशिम शहर पोलिसांकडून सत्तर हजाराचा दंड वसूल

मुंबई गुन्हे शाखेच्या नावे अचानक आलेल्या फोनमुळे डॉक्टर घाबरून गेले होते. त्यावर विश्वास ठेवत डॉक्टरने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात एक कोटी १ लाख ३० हजार रुपये हस्तांतरित केले. परंतु चोरट्यांनी ही रक्कम परत दिली नाही. दरम्यान (Fraud) फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत एका ५० वर्षीय डॉक्टरने २३ मार्चला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com