संजय जाधव | बुलडाणा
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांची बदली करण्यात आली आहे. नरवडे हे बुलडाणा जिल्ह्याचेच रहिवासी असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवसा आधीच नियुक्ती करण्यात आली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र या नियुक्तीवर आझाद हिंद शेतकरी संघटनेन आक्षेप घेतला. निवडणूक काळात कुठल्याही उच्च अधिकाऱ्याला स्वतःच्या जिल्ह्यात नियुक्ती देता येत नाही, अशी तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे विशाल नरवाडे यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सतीश रोठे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. (Latest Marathi News)
निवडणूक आयोगाने याची दखल घेत 48 तासाच्या आत आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली केली. अॅड. सतीश रोठे यांनी केलेल्या तक्रारीमुळेच विशाल नरवाडे यांची बदली झाल्याचा आरोप करत अॅड. सतीश रोठे यांना आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांच्या नातेवाईकांनी व समर्थकांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
याप्रकरणी बुलढाणा पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल झाला आहे. याची दखल घेत आता निवडणूक आयोगाने पत्र देऊन अॅड. सतीश रोठे यांना आचारसंहिता लागू असेपर्यंत संरक्षण देण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.