Washim News : दुचाकीवर कारवाईचा बडगा; वाशिम शहर पोलिसांकडून सत्तर हजाराचा दंड वसूल

Washim News : पोलीस प्रशासनाकडून वाहनांची तपासणी तीव्र करण्यात आली आहे. वाशिम शहर पोलिसांनी दिवसभर दुचाकी स्वारांवर कारवाईचा सपाटा लावला होता.
Washim News
Washim NewsSaam tv

मनोज जयस्वाल 

वाशिम : मार्च एंडिंग और असल्याने आरटीओ व पोलीस प्रशासनाकडून वाहनांची तपासणी तसेच दुचाकीवरून (Washim) ट्रिपल शीट जाणार्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. वाशिममध्ये पोलीस प्रशासनाकडून दिवसभर करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ७० हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Washim News
Jalna News: होळीच्या दिवशीच गावावर शोककळा, मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पोलीस (Police) प्रशासनाकडून वाहनांची तपासणी तीव्र करण्यात आली आहे. वाशिम शहर पोलिसांनी दिवसभर दुचाकी स्वारांवर कारवाईचा सपाटा लावला होता. यात प्रामुख्याने विना नंबर प्लेट, ट्रिपल सीट जाणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासह पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला असताना न थांबणे अशा विविध कारवाई करून हुल्लडबाज (Traffic Rules) दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. मुख्य म्हणजे धुळवड असल्याने दुचाकीवर रस्त्याने हुल्लडबाजी करत जाणाऱ्यांवर देखील कारवाई कार्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Washim News
Dhule News : विद्यूत तार तुटून शॉर्टसर्किट; शेतातील कांदा चाळ जळून खाक

१०० हुन अधिक जनावर दंडात्मक कारवाई 

वाशीम शहरात पोलिसांनी दिवसभर विविध ठिकाणी हि कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दिवसभर शंभरच्यावर दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सत्तर हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आज देखील ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com