धुळे : शेतात काढून चाळीत ठेवलेल्या कांद्याचे आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. वीज तारा तुटल्याने (Dhule) शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कांदा चाल जळाली आहे. तसेच चार देखील यात जळाला असल्याने (Farmer) शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. (Breaking Marathi News)
धुळे जिल्यातील (Sakri) साक्री-पिंपळनेर रस्त्यालगत भाडणे शिवारात वर्षा मराठे यांचे शेत असून शेतात मजुरांना राहण्यासाठी घर देखील आहे. यालगतच मक्याचा कडबा ठेवलेला होता. तसेच कांदा साठवणुकीसाठीची (Onion) कांदा चाळ देखील उभारलेली होती. शेतातुन विद्युत लाईन गेलेली आहे. यातील एक तार तुटून त्यातून ठिणग्या पडल्याने शेतातील मक्याच्या चाऱ्यास आग लागली. चार कोरडा तसेच वाऱ्यामुळे आग वेगात पसरली व त्या ठिकाणच्या चाऱ्यासोबत शेजारील कांदाचाळीनेदेखील पेट घेतला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आगीची माहिती शेतातील मजुराने वर्षा मराठे यांना दिली. दरम्यान तातडीने नगरपंचायतीच्या अग्निशामक दलास याबाबत माहिती देत ते घटनास्थळी पोहचले. यानंतर तोपर्यंत चारा व कांद्याची चाळ झाली होती. यानंतर हृषीकेश मराठे यांनी याबाबत महावितरणला माहिती देण्यात आली. महावितरणची टीम घटनास्थळी येऊन त्यांनी त्यांची कार्यवाही सुरू केली. याबाबत शेतमालक मराठे यांनी महावितरण विभागाकडे अर्ज देत तक्रार दाखल केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.