Washim Accident News : सावंगी फाटानजीक कार ऑटोचा अपघात, चार प्रवासी जखमी

कारंजाहुन धामणगाव देव येथे जवळपास ७ ते ८ प्रवासी घेऊन प्रवासी ऑटो निघाली हाेती. त्याचवेळी या मार्गावर समोरून येणाऱ्या कारची व प्रवासी ऑटोची धडक झाली.
four injured in car and auto rickshaw accident at savangi phata karanja darwha road
four injured in car and auto rickshaw accident at savangi phata karanja darwha roadsaam tv

- मनोज जयस्वाल

Washim :

वाशिम जिल्ह्यातील कारंजा - दारव्हा मार्गावरील सावंगी फाट्याजवळ आज (शनिवार) प्रवासी ऑटो व कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ऑटोमधील चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले आहे. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी - कारंजाहुन धामणगाव देव येथे जवळपास ७ ते ८ प्रवासी घेऊन प्रवासी ऑटो निघाली हाेती. त्याचवेळी या मार्गावर समोरून येणाऱ्या कारची व प्रवासी ऑटोची धडक झाली.

four injured in car and auto rickshaw accident at savangi phata karanja darwha road
Wardha Lok Sabha 2024 : ध्यानीमनी नसताना दुस-या पक्षात लढावं लागत आहे, इंडिया आघाडीला बळकट करु या : अमर काळे

या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारंजा येथील रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी अपघाताची माहिती देताच रुग्णवाहिका चालकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बोदेगाव व लोही येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पाेलिस अपघाताचा तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

four injured in car and auto rickshaw accident at savangi phata karanja darwha road
Buldhana Lok Sabha Constituency : बुलढाणा लाेकसभा मतदारसंघ काॅंग्रेसला घ्या, पदाधिका-यांचा सामूहिक राजीनामा; नाना पटाेलेंवर दबाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com