Bhandara Temperature Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Temperature : सूर्य आग ओकतोय; भंडाऱ्याचा पारा ४३ अंशाच्या वर

Akola News : उन्हाची तीव्रता यंदा अधिक जाणवत आहे. यंदा उशिराने उन्हाची तीव्रता जनविण्यास सुरवात झाली असली तरी अधिक तापदायक जाणवत आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश शहरातील (temperature) तापमान हे मार्चमध्येच ४० अंशाच्या वर गेले असून (Bhandara) भंडारा जिल्ह्यातील पारा हा आता ४३ अंशाच्या वर गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. (Maharashtra News)

उन्हाची तीव्रता (High Temperature) यंदा अधिक जाणवत आहे. यंदा उशिराने उन्हाची तीव्रता जाणविण्यास सुरवात झाली असली तरी अधिक तापदायक जाणवत आहे. राज्यातील (Jalgaon) जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, अकोला या शहरातील तापमान मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच ४० अंशाच्या वर गेल्याचे पाहण्यास मिळाले. तर एप्रिल महिन्याची सुरवात झाली तेव्हापासून दुपारच्या वेळचे तापमान ४२ अंशाच्या पार पोहचले आहे. 

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यात तापमानाचा पार वाढण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असुन आजघडीला भंडारा जिल्हा पारा ४३ अंश सेल्सिअस असून नागरिक घराबाहेर पडण्यास नकारात्मकता दर्शवीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? आत्ताच हा यशाचा मंत्र लक्षात ठेवा

Thane : आई की, हैवान? ठाण्यातील महिलेचा लेकीला अमानुष मारहाण करतानाचा Video Viral

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadhi Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

SCROLL FOR NEXT