Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव २०२६ साठी ४१८ विशेष गाड्यांची घोषणा

Marathi Breaking Live Headlines Updates: अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन २०२६, महाराष्ट्र दुष्काळ दौरा, राज्याला मुसळधार पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

अमरावतीत राणा दांपत्याच्या गणपती बाप्पाचा विसर्जन

अमरावतीत राणा दांपत्याच्या गणपती बाप्पाचा विसर्जन...

भाजप नेत्या नवनीत राणा आमदार रवी राणा देखील घरच्या बाप्पाच्या गणपती विसर्जनाला उपस्थित...

बाप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्ती देवो दिवाळीच्या पूर्वी नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येवो-रवी राणा.

शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेताच्या बांधावर जात आहे ग्राउंड वर जात आहे-नवनीत राणा

बुलढाणा सह अमरावती परिक्षेत्रात सकाळपासून विसर्जन मिरवणुका शांततेत

बुलढाणा सह अमरावती परिक्षेत्रात सकाळपासून विसर्जन मिरवणुका शांततेत...

रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी

आतापर्यंत 40% मंडळांचं विसर्जन संपन्न

अति संवेदनशील भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त..

खामगावात पोलीस विभागाचे विशेष लक्ष...

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर महेश पाटील यांची माहिती

रायगडमध्ये गणेश विसर्जनाला प्रारंभ

गेली 12 दिवस गणरायाची मनोभावे पुजा केल्यानंतर रायगड मधील गणेशभक्तांनी आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. या वेळी पारंपारीक पद्धतील वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या.

पुण्याचा पाचवा मानाचा गणपती, केसरी वाड्यातील गणपतीचं 6 वाजता विसर्जन

पुण्याचा पाचवा मानाचा केसरी वाडा गणपतीच. 6 वाजून 11 मिनिटांनी विसर्जन करण्यात आल आहे. पर्यावरण पूरक पद्धतीने कृत्रिम हौदात या वर्षी देखील केसरी वाडा गणपतीच विसर्जन करण्यात आल आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात टिळक कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या केसरी वाडा गणपतीला निरोप दिला आहे.

गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी स्पेनमधील एक कुटुंब मुंबईत आलं

पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन

पुण्याचा तिसरा मानाचा गुरुजी तालीम गणपतीच. 5 वाजून 5 मिनिटांनी विसर्जन करण्यात आल आहे. पर्यावरण पूरक पद्धतीने कृत्रिम हौदात या वर्षी देखील गुरुजी तालीम गणपतीच विसर्जन करण्यात आल आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात पुणेकर भाविकांनी आपल्या लाडक्या गुरुजी तालीम गणपतीला निरोप दिला आहे.

रायगडमध्ये 18 हजार 544 गणेशमूर्तींचे विसर्जन; अनंत चतुर्दशीसाठी प्रशासन सज्ज

रायगडमध्ये अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर 18 हजार 544 गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.
यामध्ये 18 हजार 378 घरगुती आणि 166 सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे. सावित्री, काळ, पाताळगंगा, आंबा नद्यांसह समुद्रकिनारे आणि कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होणार आहे.
विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, ढोल-ताशांच्या गजरात काही वेळात मिरवणुकांना सुरुवात होणार आहे.

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर लोखंडी पाईप कोसळला 

चेंबूरमध्ये सनातन शाळेबाहेर गुरुवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. मोनोरेल स्थानकातून लोखंडी पाईप थेट शाळेच्या बसवर कोसळला. सुदैवाने बसमधील कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही; मात्र बसचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून पाहणी व चौकशीची मागणी होत आहे.

यवतमाळमध्ये अल्पभूधारक युवा शेतकऱ्याचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे अल्पभूधारक तरुण शेतकरी विष्णू सुरोशे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. नापिकीमुळे ते त्रस्त असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी नातेवाईकांशी आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली.

भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्तांना एक लाख वडापावचे वाटप

अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भिवंडी शहरात गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर परोपकार संस्थेच्या वतीने गणेश भक्तांसाठी मोफत वडापाव वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई, भाईंदर आणि भिवंडी परिसरात संस्थेच्या वतीने तब्बल पाच ते साडेपाच लाख वडापावचे मोफत वितरण करण्यात येत आहे. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात तब्बल एक लाख वडापावचे वाटप करण्यात येणार आहे.

सिल्वर ओकवर पवार कुटुंबीयांची बैठक

सिल्वर ओकवर पवार कुटुंबीयांची बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, जय पवार आणि पार्थ पवार उपस्थित आहेत.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ही बैठक सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याची शरद पवार यांची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं, तर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात अजित पवारांच्या पक्षाचं पॅनेल निवडणुकीच्या तयारीत आहे. त्याचबरोबर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

कुणाल पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; दुष्काळी पाहणी दौऱ्याला सुरुवात

धुळे ग्रामीणचे माजी आमदार तथा भाजपचे नेते कुणाल पाटील यांच्यावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलला नाचवल्या वरून विरोधकांनी चांगलीच टीका केली होती, परंतु आता कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुष्काळी पाहणी दौरा सुरू केला आहे.

तेजुकायाचे गणपती बाप्पा गिरगाव विसर्जन स्थळी दाखल

तेजुकायाचे गणपती बाप्पा गिरगावातील विसर्जन स्थळी दाखल झाले आहेत. बाप्पाच्या आगमनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भक्तांच्या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी तळोद्यात एसटी बसला अपघात; ५ ते ६ प्रवासी जखमी

अनंत चतुर्दशीच्या दिवशी तळोद्यात एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. तळोद्यातून सीलिंगपूरकडे जाणारी एसटी बस रांझणी फाट्याजवळ पलटली. प्राथमिक माहितीनुसार, समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

या बसमध्ये सुमारे २५ ते ३० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ५ ते ६ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ही बस प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी वापरली जाते. मात्र, अनंत चतुर्दशीनिमित्त शाळांना सुट्टी असल्याने आज बसमध्ये विद्यार्थी नव्हते. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

अपघातात एसटी बससह दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तळोदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

पार्थ आणि जय पवार शरद पवारांच्या भेटीला

पार्थ पवार आणि जय पवार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेटीसाठी पोहोचले आहेत. मात्र, या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भेटीत काय चर्चा झाली, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

- पालकमंत्री गिरीश महाजनांसह लोकप्रतिनिधींच्या उपस्थित शुभारंभ

- मानाचा पहिल्या नाशिक मनपाच्या गणरायाची आरती करून मिरवणुकीला सुरुवात

- वाजत गाजत आज गणरायाला दिला जाणार भक्तीमय वातावरणात निरोप

- मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवत विसर्जन मिरवणुकीत नोंदवला सहभाग

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसच्या हालचालींना वेग

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हालचालींना वेग आला आहे. उमेदवार निवडीसाठी काँग्रेसने माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

या समितीत यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके यांच्यासह काँग्रेसच्या ११ नेत्यांचा समावेश आहे. समितीकडून इच्छुक उमेदवारांचा आढावा घेतल्यानंतर आणि शिफारस केल्यानंतर पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबरला होणार असून, २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करण्यासाठी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.

चंद्रपुरात गणेश विसर्जनाला सुरुवात; जटपूरा गेट परिसरात पोलिस आणि कार्यकर्त्यांत शाब्दिक बाचाबाची

चंद्रपुरातील गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून, गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मिरवणुकांना काहीसा उशीर झाला. मात्र, पावसाने उसंत घेताच गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू केली असून, शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान, जटपूरा गेट परिसरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची शाब्दिक बाचाबाची झाली. मिरवणुकीदरम्यान झालेली गर्दी पांगवताना हा प्रकार घडला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत ती लगेच आटोक्यात आणली.

मधुरिमाराजेंचा लेझीमवर ठेका; गणेश विसर्जन मिरवणुकीत रंगला उत्साह

गणेश विसर्जन मिरवणुकीत राजघराण्याच्या वारसदार मधुरिमाराजे छत्रपती यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. श्री हुजूर गल्ली सेवा मंडळाच्या महिला लेझीम पथकासोबत सहभागी होत मधुरिमाराजेंनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर उत्स्फूर्तपणे ठेका धरला.

महिलांच्या लेझीम पथकात सहभागी होऊन त्यांनी मिरवणुकीचा आनंद लुटला. मधुरिमाराजेंच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे विसर्जन मिरवणुकीतील उत्साह आणखी वाढला.

लालबागच्या राजा मंडळाकडून मुंबई पोलिसांचे आभार; चोख बंदोबस्तासाठी मानले ऋण

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान चोख बंदोबस्त आणि सुरळीत नियोजन केल्याबद्दल लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुंबई पोलिसांचे आभार मानण्यात आले. लाखो भाविकांच्या गर्दीत विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल मंडळाने पोलिसांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आला; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आल्यानंतर भक्तांच्या जयघोषात विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली. बाप्पाच्या दर्शनासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

पारंपरिक पद्धतीने निघाली श्री निलमणी गणेशाची विसर्जन मिरवणूक; विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्तीचा संदेश

नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहराचे आराध्यदैवत असलेल्या पुरातन वेशीतील श्री निलमणी गणेशाच्या उत्सव मूर्तीची विसर्जन मिरवणूक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साध्या व पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. सनई-चौघडे आणि बँडच्या तालात शहरातून मिरवणूक मार्गस्थ झाली.

मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाचे दर्शन घेत भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी हातात व्यसनमुक्तीचे संदेश देणारे फलक घेत मिरवणुकीत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देत समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ओळख,मोदक घेण्यासाठी लाखो भाविक हिंगोलीत दाखल

नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ओळख असलेल्या हिंगोलीच्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती दर्शनाला मध्यरात्रीपासून लाखो भाविक दाखल झाले आहेत, सकाळपासून मंदिर परिसरात या भाविकांना नवसाचे मोदक वाटप करण्यात येत आहेत, कर्नाटक, बिदर आंध्रप्रदेश यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला व चिमुकले गणेश भक्त हिंगोलीत दाखल झाले आहेत, हिंगोली शहरातील गांधी चौक ते चिंतामणी गणपती मंदिर अशा भाविकांच्या दर्शनासाठी तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत तर या भाविकांच्या सेवेसाठी हिंगोलीकरांनी मोफत महाप्रसाद वाटप करण्यास सुरुवात केली आहे,

दिल्लीच्या साईभक्ताकडून साईबाबांना दीड लाखांचा चांदीचा मुकुट अर्पण

साईबाबांच्या चरणी लीन होत देशभरातील भाविक भरघोस दान करत असतात.. याच भक्तीभावातून दिल्ली येथील साईभक्त अमित बजाज यांनी साईबाबांना 1 लाख 63 हजार रुपये किमतीचा, आकर्षक नक्षीकाम असलेला सुबक चांदीचा मुकुट अर्पण केला आहे.. या मुकुटाचे वजन 777 ग्रॅम इतके असून, साईबाबा संस्थानच्या वतीने दानशूर साईभक्ताचा सत्कार करण्यात आलाय..

बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

बार्शी तालुक्यातील कासारी गावातील शेतकरी सुभाष माळी यांनी पिकावर फवारणी करण्याचे औषध घेऊन केली आत्महत्या..

सुभाष माळी यांनी 72 गुंठे शेतीत सोयाबीन पीक लावलं होतं. दोन महिन्यापासून पावसाने दांडी मारल्यामुळे पीक जळून गेलं होतो

त्यात बँकेचे कर्ज आणि मुलीचे लग्न झाल्यामुळे तब्बल सात ते आठ लाख रुपये कर्ज झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं..

याच तणाव आणि नैराश्यातून सुभाष माळी यांनी टोकाच पाऊल उचललं आहे..

याप्रकरणी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात नोंद करण्यात आली आहे..

विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक लेझीम नृत्यावर फिरकल्या भाजप नेत्या डॉ हीना गावित....

नंदुरबार गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या नेत्या माजी खासदार डॉ. हिना गावित हलगीच्या तालावर पारंपरिक पद्धतीने नृत्य करताना दिसून आल्या नंदुरबारच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रसिद्ध पाच पावली नृत्य हे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते प्रथम मानाचा दादा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत हिना गावित यांनी आपली बहीण तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्यासोबत सहभाग घेतला हलगीच्या तालावर पारंपरिक नृत्याचा ठेका धरत दोन्ही बहिणींनी गणेशोत्सवाचा आनंद लुटला यावेळी मिरवणुकीत सहभागी गणेशभक्त आणि कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला पारंपरिक वेशभूषा ढोल-ताशे हलगी आणि पाच पावली च्या तालावर मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले...

लातूर जिल्ह्यात दुष्काळाचा पहिला बळी

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या डोंगरगाव बोरी येथील 33 वर्षीय अंकुश काळे या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्जबाजारीपणा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ते आर्थिक संकटात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अंकुश काळे यांच्यावर एसबीआय निटूर शाखेचे सुमारे 1 लाख रुपयांचे, तर डीसीसी बँकेचे सुमारे 40 हजार रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. दुष्काळामुळे शेतीचे नुकसान आणि वाढता आर्थिक ताण यामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पावसा बावी पूर्ण खरी भारतातून गेलाय त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्या पुढे पडल्याच सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे डोंगरगाव बोरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जळगावच्या मानाच्या गणपतीचे विसर्जन; महापौरांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली आरती

जळगाव मध्ये गणेश विसर्जना सुरु आहे यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं संकट असल्याने, गणपतीचे विसर्जन तळ्यात न करता महानगरपालिकेकडून गणेश मूर्तीचे संकलन करण्यात येतेय. शहरात 50 हून अधिक ठिकाणी महानगर पालिकेच्या वतीने गणेश संकलन केंद्र उभारण्यात आलं आहे. नागरिकांनी देखील याला प्रतिसाद दिलाय. दरम्यान ठीक ठिकाणाहून ट्रॅक्टर मध्ये गणेश मूर्तीचे संकलन करून शहरातील मेहरूण तलाव परिसरात गणेशाचं विसर्जन करण्यात येतंय.

नंदुरबार: प्रथम माणाचा गणपती असलेल्या दादा आणि बाबा गणपतीचा रथ दोरीने ओढत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात..

नंदुरबार मधल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली आहे. प्रथम माणाचा गणपती असेलल्या दादा आणि बाबा गणपतीचा रथ दोरीने ओढत विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. नंदुरबारच्या दादा आणि बाबा गणपतीच्या रथांची हरीहर भेट ही या गणेश उत्सव मिरवणूकीच्या आकर्षणाचे केंद्रबिदु असते.दादा आणि बाबा गणपतीचा रथ हा शहर भरातून फिरल्यानंतर त्याची जागोजागी भक्तांकडून पुजा अर्चा आरती केली जाते यानंतर रात्री दहाच्या सुमारास ही हरीहर भेट अपेक्षीत आहे. टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक रुप देण्या अगोदर पासूनच नंदुरबारचा दादा आणि बाबा गणपतीची सार्वजनिक रुपांने स्थापना झाली आहे. काळ्या माती पासून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही साच्याविना साकारलेल्या दादा बाबा गणरायाच्या मुर्ती ह्या नंदुरबार करांच्या आस्थेचे केंद्र असून त्यांना निरोप देण्यासाठी पारंपारीक पद्धतीने नृत्यावर ठेका धरत कार्यकर्त्यांमध्ये जोष उल्हासाचे वातावरण दिसून येत आहे.मिरवणूकीचा रथ ओढून नेण्याची परंपरा आजही कायम आहे..

कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांनी ढोल वाजून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला

ढोल ताश्यांच्या गजरात करीरोडचा कैवारी गणपती विसर्जन मिरवणूक

ढोल-ताशांच्या गजरात करीरोडच्या कैवारी गणपतीची विसर्जन मिरवणूक उत्साहात निघाली आहे.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे.

सांगली: १ लाख ११ हजार १११ रुपयांचा 'मानाचा नारळ' अन् १२ हजारांची धनाजोडी

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ, शिरगाव यांच्या वतीने आयोजित सप्ताहाचे यंदा अखंड हरीनाम सप्ताह वर्ष ९९ वे तर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला.. या सोहळ्याच्या सांगतेनंतर आयोजित करण्यात आलेला प्रसादाच्या वस्तूंचा लिलाव यंदा प्रचंड चुरशीचा आणि ऐतिहासिक ठरला. भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या लिलावात सर्वोच्च आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला 'मानाचा नारळ' तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपयांची बोली लावून गणपती पाटील यांनी पटकावला.. यंदाच्या या एकूण २३ वस्तूंच्या लिलावातून मंदिर समितीच्या झोळीत एकूण २,००,८३२ रुपयांचा विक्रमी निधी जमा झाला.

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पिकांची केली पाहणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तसेच पावसाची अनियमितता राहिल्यामुळे काही भागांमध्ये शेतीपिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

पावसातील मोठा खंड आणि त्यानंतर जाणवलेली तीव्र उष्णता यामुळे भातपिकासह अन्य पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, विहिरींच्या पाणीपातळीतही घट होत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज मालवण तालुक्यातील पोइप तसेच देवगड तालुक्यातील पोयरे, नारिंग्रे या गावांना भेट देऊन केली पाहणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात, वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात, वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन.

- संघ आणि संघ विचार परिवारातील संघटनांकडून देशभरात विविध उपक्रम.

- विजयादशमी उत्सव संघासाठी विशेष महत्त्वाचा, दरवर्षी भव्य स्वरूपात आयोजन.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा मेट्रोतून प्रवास

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा मेट्रोतून प्रवास

मेट्रो सेवेचा वापर करण्याचे ना. पाटील यांचे आवाहन

Nagpur Raja Visarjan : नागपूरच्या राजाला आज अखेरचा निरोप देण्यात येणार

- नागपूरचा मानाचा गणपती असलेल्या नागपूरच्या राजाला आज अखेरचा निरोप देण्यात येणार.

- विधीवत पूजा आरती करून ढोल ताशाच्या गजरात शहरात भव्य मिरवणूक काढून करण्यात येणार विसर्जन.

- नागपुरात गणेश विसर्जनासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन..

एसबीआय बँकेत दिवसाढवळ्या शेतकऱ्याचे ३५ हजार रुपये लंपास

एसबीआय बँकेत दिवसाढवळ्या शेतकऱ्याचे ३५ हजार रुपये लंपास

चोरट्याचा प्रताप सीसीटीव्हीत कैद

पैसे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला चोरट्याचा दणका

जानेफळमध्ये खळबळ, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

दिल्लीत गोळीबाराची घटना

दिल्लीत गोळीबाराची घटना

बिल्डरच्या ऑफिसवर केला गोळीबार

Parelcha Raja Visarjan : परळचा राजा आणि तेजुकाया या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात

मुंबईतील मनाचे गणपतीपैकी मानल्या जाणाऱ्या परळचा राजा आणि तेजुकाया (tejukaya ganpati visarjan ) या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे

ढोल ताशांच्या गजरांमध्ये लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे

Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात

मुंबईतील मनाचे गणपतीपैकी मानल्या जाणाऱ्या मुंबईच्या राजाला आज निरोप देण्यात येणार

निरोपासाठी मंडळ सज्ज झालं असून मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे

अमरावतीत डेंग्यू मलेरियाचा वाढता धोका.. डेंग्यूचे १३६ तर मलेरियाचे ८६ रुग्ण..

अमरावती जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानंतर निर्माण झालेल्या दमट वातावरणामुळे कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे.

१७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे तब्बल १३६, मलेरियाचे ८६, तर चिकुनगुनियाचे ६३ रुग्ण आढळून आले आहेत.

उजनी धरणातील 35 टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव

उजनी धरणातील 35 टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव;

धरणाच्या निर्मिती नंतर पहिल्यांदाच निर्णय

Ganpati Visarjan 2026 : आज राज्यभरात ११ दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात येणार

आज सर्वत्र ११ दिवसांनंतर गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात येणार

लाडक्या गणरायाला निरोप देताना भाविक भावुक झालेले पाहायला मिळतायत

मुंबईसह अनेक ठिकाणी मंडळांची लगबग सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com