Soaked pomegranate: डाळिंबाचे दाणे १५ मिनिटं कोमट पाण्यात भिजवून खाल्ले तर काय होईल? हा उपाय वाचून थक्क व्हाल

Surabhi Jayashree Jagdish

पाण्यात कसं भिजवावं?

सर्वप्रथम एक ताजे डाळिंब घ्या आणि ते न सोलता कोमट पाण्यात सुमारे १० ते १५ मिनिटं ठेवा. त्यानंतर डाळिंब पाण्यातून बाहेर काढून त्याची साल काढा आणि आतील दाणे खा. आठवड्यातून दोन वेळा अशा पद्धतीने कोमट पाण्यात भिजवलेले डाळिंबाचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

pomegranate health benefits | saam tv

कोमट पाण्यात भिजवल्याने काय होतं?

डाळिंबाच्या सालीमध्ये टॅनिन आणि एलॅजिटॅनिन यांसारखे पोषक घटक असतात. कोमट पाण्याच्या प्रभावामुळे हे घटक विरघळून डाळिंबाच्या दाण्यांमध्ये पोहोचतात. त्यामुळे डाळिंबाचे गुणधर्म आणखी वाढतात आणि ते खाल्ल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

pomegranate soaked in warm water | saam tv

नसांची आणि स्नायूंची कमजोरी

ज्या लोकांना स्नायू आणि नसांमध्ये कमजोरी जाणवते त्यांनी अशा पद्धतीने डाळिंब खावं, असं सांगितलंय. कोमट पाण्यात भिजवलेले डाळिंबाचे दाणे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे नसांची आणि स्नायूंची कमजोरी कमी होण्यास फायदा मिळतो.

pomegranate soaked in warm water | saam tv

झोप न येण्याची समस्या

ज्या लोकांना झोप न येण्याची समस्या असते, त्यांनी कोमट पाण्यात भिजवलेले डाळिंबाचे दाणे खावेत. अशा पद्धतीने डाळिंब खाल्ल्याने झोपेशी संबंधित समस्येत फायदा मिळतो. वर सांगितलेल्या पद्धतीने डाळिंब तयार करून खाण्याचा सल्ला दिला जातो.

pomegranate for digestion | saam tv

तणाव आणि नैराश्यात फायदा

ज्या लोकांना तणाव आणि नैराश्यासारख्या समस्या असतात त्यांनी कोमट पाण्यात भिजवलेलं डाळिंब खावं. डॉ. सुभाष गोयल यांच्या मते, कोमट पाण्यात ठेवलेलं डाळिंब खाल्ल्याने मन शांत होण्यास मदत होते.

pomegranate for liver | saam tv

पचनशक्तीसाठी फायदा

डाळिंब खाल्ल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. डाळिंब कोमट पाण्यात भिजवून खाल्ल्यास हा फायदा आणखी वाढतो. यामुळे पचनक्रिया संतुलित राहण्यास मदत होते.

pomegranate and sleep | saam tv

लिव्हरसाठी फायदा

कोमट पाण्यात भिजवून डाळिंब खाल्ल्याने लिव्हरलाही फायदा होतो. अशा पद्धतीने खाल्लेले डाळिंब लिव्हरसाठी चांगले असल्याचं नमूद केलंय. यासोबतच पचनसंस्थेलाही फायदा मिळतो.

pomegranate for sleep | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

pomegranate for mental health | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Morning drink | saam tv
येथे क्लिक करा