Surabhi Jayashree Jagdish
दालचिनीचं पाणी शरीरातील चयापचय सुधारण्यास काही प्रमाणात मदत करू शकते, त्यामुळे कॅलरी खर्च होण्यास हातभार लागू शकतो. याशिवाय मदत करत असल्याने वारंवार भूक लागणे आणि गोड खाण्याची इच्छा कमी होऊ शकते.
काही संशोधनांनुसार दालचिनी इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकतं. त्यामुळे काही लोकांमध्ये उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी औषधांऐवजी यावर अवलंबून राहू नये.
या पाण्याने शरीरातील सौम्य सूज कमी होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे काही लोकांना सकाळचा अंगदुखीचा त्रास किंवा सांध्यांमधील समस्या कमी झाल्याची जाणीव होऊ शकते. दीर्घकालीन वेदना किंवा गंभीर सूज असल्यास वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.
रिकाम्या पोटी दालचिनीचं कोमट पाणी घेतल्याने काही लोकांमध्ये गॅस, पोट फुगणं आणि अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. चांगली पचनक्रिया झाल्यास दिवसभर पोट हलकं वाटू शकतं.
दालचिनीमध्ये काही बॅक्टेरियाविरुद्ध काम करणारे घटक आढळतात. जे तोंडातील जिवाणूंची वाढ कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे श्वासाची दुर्गंधी कमी होऊन तोंड ताजेतवाने वाटण्यास मदत मिळू शकते.
दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. काही अभ्यासांमध्ये तिच्या काही घटकांमध्ये सूक्ष्मजंतूंविरुद्ध कार्य करण्याची क्षमता आढळली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
एक दालचिनीची काडी किंवा एक टीस्पून दालचिनी पावडर ३ ते ४ कप पाण्यात १५ ते २० मिनिटं उकळा आणि नंतर गाळून कोमट असताना प्या. मात्र दालचिनीचं नियमित सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.