Bhandara Latest News : पवनीमध्ये वायू गळती,15 जणांची प्रकृती बिघडली, दाेघे गंभीर

pavani bhandara water treatment plant : या घटनेमुळे 500 मीटर अंतरावरील रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास जाणवला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
chlorine leak at a drinking water treatment plant near bhandara
chlorine leak at a drinking water treatment plant near bhandara saam tv

शुभम देशमुख, भंडारा

Bhandara :

भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथे शुद्ध पाण्याचा पुरवठा करता यावा म्हणून जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या क्लोरीन वायूच्या हंड्यामधून रात्रीच्या सुमारास वायू गळती झाली. यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत 2 जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आले आहे.

हा प्रसंग पालिका कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी यांनी वायू गळती होत असलेला हंडा जलशुद्धी केंद्राच्या बाहेर काढून क्लोरीन वायू हवेत मिसळणार नाही याची दक्षता घेतली. तसेच पाणी साचलेल्या खड्ड्यात हंडा टाकीत टाकला.

chlorine leak at a drinking water treatment plant near bhandara
Nashik Accident News: धानोरे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दोन मुली जखमी

तरी सुद्धा 500 मीटर अंतरावरील रहिवासी यांना श्वास घेण्यास त्रास जाणवला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत 15 जणांची प्रकृती अस्थिर असल्याचे सांगितले जात आहे. तर 2 जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

chlorine leak at a drinking water treatment plant near bhandara
Kolhapur Crime News : शीर नसलेला मृतदेह आढळल्याने कोल्हापुरात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com