Kolhapur Crime News : शीर नसलेला मृतदेह आढळल्याने कोल्हापुरात खळबळ

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने देखील परिसरात तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती शहरात वा-या सारखी पसरली. यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली हाेती.
unidentified body found in kolhapur
unidentified body found in kolhapur saam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल शेजारी हुतात्मा पार्कच्या ओढ्यात एक मृतदेह पडल्याची माहिती पाेलिसांनी मिळाली. पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तेथे त्यांना शीर कापलेला एका पुरुषाचा मृतदेह आढळला. दरम्यान या प्रकाराची माहिती कोल्हापूर शहरात वा-या सारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी माेठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी वाढली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काेल्हापूर महापालिकेकडून जेसिबीच्या माध्यमातून नालेसफाई मोहिम सुरू आहे. ही स्वच्छता माेहिम सुरु असताना कर्मचारी यांना ओढ्यात मृतदेह आढळला. त्यांनी लगेच याची माहिती पाेलिसांना दिली.

unidentified body found in kolhapur
Konkan Politics: नारायण राणेंची जय्यत तयारी, उदय सामंतांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा; तिढा वाढला (Video)

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पुरुष जातीचा शीर कापलेला सडलेला मृतदेह घटनास्थळी आढळला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने देखील परिसरात तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती शहरात वा-या सारखी पसरली. यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली हाेती. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

unidentified body found in kolhapur
Raju Shetti : उद्धव ठाकरेंनी हातकणंगलेमध्ये देऊ केलेली उमेदवारी राजू शेट्टींनी नाकारली,कारण ही सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com