Konkan Politics: नारायण राणेंची जय्यत तयारी, उदय सामंतांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा; तिढा वाढला (Video)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधील शिवसेना आणि भाजपची समन्वय समितीची बैठकीस उदय सामंत हे अनुपस्थित राहिले. त्यांनी मंत्री नारायण राणे यांच्याशी बंद खोलीत काही वेळ चर्चा केली. त्यानंतर ते मुंबईला गेले.
shiv sena will contest ratnagiri sindhudurg lok sabha constituency says uday samant
shiv sena will contest ratnagiri sindhudurg lok sabha constituency says uday samant Saam TV

- विनायक वंजारे

Ratnagiri Sindhudurg Constituency :

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency) संघात महायुतीचा उमेदवार ठरला नसला तरी भाजपकडून मात्र वेगाने प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. दूसरीकडे सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (mp narayan rane) प्रचारास प्रारंभ केला असला तरी मुख्यमंत्री शिंदे यांना त्रास नकाे म्हणून बंधू किरण सामंत (kiran samant) यांनी माघारीचे स्टेटस समाज माध्यमात ठेवले हाेते असे उद्याेग मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी नमूद केले आहे. शिवसेनेचा अद्याप मतदारसंघावर दावा कायम असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सिंधुदुर्ग येथे भाजपची कोअर कमिटीची महत्वाची संघटनात्मक बैठक कुडाळ येथे बुधवारी संपन्न झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण, निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीस उपस्थिती हाेती. त्यानंतर संघटनात्मक आढावा बैठक देखील झाली. या बैठकीत प्रमुख नेते कार्यकर्त्यांना प्रचारा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

shiv sena will contest ratnagiri sindhudurg lok sabha constituency says uday samant
Raju Shetti : उद्धव ठाकरेंनी हातकणंगलेमध्ये देऊ केलेली उमेदवारी राजू शेट्टींनी नाकारली,कारण ही सांगितलं

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधील शिवसेना आणि भाजपची समन्वय समितीची बैठकीस उदय सामंत हे अनुपस्थित राहिले. त्यांनी मंत्री नारायण राणे यांच्याशी बंद खोलीत काही वेळ चर्चा केली. त्यानंतर ते मुंबईला गेले.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

बंधू किरण सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मंगळवारी रात्री उशिरा किरण यांनी माघार घेत असल्याचे स्टेटस ठेवलं होते. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते स्टेटस काढल आहे.

shiv sena will contest ratnagiri sindhudurg lok sabha constituency says uday samant
Kalyan Dombivali Municipal Corporation : केडीएमसीची 42 वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी कर वसुली,622 कोटींचा टप्पा पार

सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघातील उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. या मतदारसंघावर आजही शिवसेनेचाच दावा आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी ही निश्चितपणे शिवसेनेलाच मिळेल असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळमध्ये केला. या दाव्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजून कायम राहिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

shiv sena will contest ratnagiri sindhudurg lok sabha constituency says uday samant
Vanchit Bahujan Aghadi : परभणी लाेकसभा मतदारसंघातून 'वंचित'नं नाकारलं, आलमगीर खान यांचा नेत्यांवर आराेप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com