Vanchit Bahujan Aghadi : परभणी लाेकसभा मतदारसंघातून 'वंचित'नं नाकारलं, आलमगीर खान यांचा नेत्यांवर आराेप

Vanchit Bahujan Aghadi Latest Marathi News : आलमगीर खान हे 2019चे परभणी लोकसभेचे वंचित उमेदवार होते. त्यावेळी त्यांना 1 लाख 49 हजार मतं मिळाली होती.
alamgir khan resigns from vanchit bahujan aghadi parbhani
alamgir khan resigns from vanchit bahujan aghadi parbhani saam tv

Parbhani Lok Sabha Constituency :

वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवार म्हणून बाबासाहेब उगले (Babasaheb Ugle) यांच्या नावाची नुकतीच घाेषणा झाली. या घोषणेनंतर वंचित बहुजन आघाडीचे परभणीचे जिल्हाध्यक्ष आलमगीर खान (alamgir khan) यांनी राजीनामा देत असल्याचे आज (बुधवार) जाहीर केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकांसाठी आलमगीर खान हे इच्छुक होते. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे खान यांनी राजीनामा दिला. खान यांनी परभणी येथे पत्रकार परिषदेत पक्षाने उमेदवारी जाहीर करताना कार्यकर्ते आणि त्यांच्या भावना लक्षात घेतल्या नाहीत असा आरोप वंचितच्या नेत्यांवर केला आहे. खान यांनी आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचे आज जाहीर केले.

alamgir khan resigns from vanchit bahujan aghadi parbhani
Shivsena: काेल्हापुरातील उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते आमच्यासोबत येण्यास इच्छुक; शिवसेना नेते पांडुरंग पाटलांचा दावा

आलमगीर खान हे 2019चे परभणी लोकसभेचे वंचित उमेदवार होते. त्यावेळी त्यांना 1 लाख 49 हजार मतं मिळाली होती.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

2019 चे मताधिक्य

संजय उर्फ बंडू जाधव (भाजप शिवसेना युती उमेदवार ) 5 लाख 38 हजार 941 मतं

राजेश विटेकर (राष्ट्रवादी उमेदवार ) 4 लाख 96 हजार 742 मतं

आलमगीर खान (वंचित एमआयएम उमेदवार) 1 लाख 49 हजार 946 मतं

संजय उर्फ बंडू जाधव यांनी 42 हजार 199 मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा पराभव केला.

Edited By : Siddharth Latkar

alamgir khan resigns from vanchit bahujan aghadi parbhani
Success Story : भंडा-यातील शेतक-याच्या जीवनात पेरुने निर्माण केला गोडवा, 10 लाखांची कमाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com