Shivsena: काेल्हापुरातील उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते आमच्यासोबत येण्यास इच्छुक; शिवसेना नेते पांडुरंग पाटलांचा दावा

पाटील म्हणाले या दाै-याचा अहवाल आम्ही आमच्या महायुतीच्या कोर कमिटीच्या बैठकीत मांडला आहे. हातकणंगले मधील सहा विधानसभा मतदारसंघात फिरत असताना अनेक ठिकाणी समाधान पाहायला मिळालं.
pandurang patil says  kolhapur uddhav thackeray faction karykarta wish to enter shiv sena
pandurang patil says kolhapur uddhav thackeray faction karykarta wish to enter shiv senasaam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

कोल्हापूर येथील उद्धव ठाकरे गटातील (uddhav thackeray faction) अनेक नेते आमच्यासोबत येण्यास इच्छुक आहेत असे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (hatkanangale lok sabha constituency) शिवसेना पक्षाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी पत्रकारांशी बाेलताना केला. दरम्यान आमच्यात नाराजी काेणाचीही नाही. सगळ्यांना एकत्र करून आम्ही पुढे जाणार आहोत. जर मित्रपक्षाशी चर्चा करायची असेल तर मी त्यांना भेटेन असेही पाटील यांनी नमूद केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष निरीक्षक पांडुरंग पाटील हे काेल्हापूर दाै-यावर आले हाेते. विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांना कल्पना न देता पाटील यांनी शनिवार पासून हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेतला. त्याबाबतची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

pandurang patil says  kolhapur uddhav thackeray faction karykarta wish to enter shiv sena
Konkan Politics : नारायण राणेंनी दम दिल्याने किरण सामतांची निवडणुकीतून माघार; वैभव नाईकांचा राणेंवर गंभीर आराेप

पाटील म्हणाले या दाै-याचा अहवाल आम्ही आमच्या महायुतीच्या कोर कमिटीच्या बैठकीत मांडला आहे. हातकणंगले मधील सहा विधानसभा मतदारसंघात फिरत असताना अनेक ठिकाणी समाधान पाहायला मिळालं.

यावेळी पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या कामाचे काैतुक केले. त्यांनी कमी वेळेत चांगले काम केल्याचे दिसून आले. संजय शिरसाठ यांच्याशी चर्चा केल्याचे सांगत त्यांनी आपलं विधान बदललं आहे. धैर्यशील माने यांना निवडून देण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षाने ठरवलं आहे.

pandurang patil says  kolhapur uddhav thackeray faction karykarta wish to enter shiv sena
Satara Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंच्या भेटीनंतर गिरीश महाजन शिवेंद्रराजेंच्या दारी, भेटीत स्पष्टच सांगितलं (video)

दरम्यान एका प्रश्नावर बाेलताना पाटील म्हणाले भाजपच्या एका नेत्याने भूमिका मांडली म्हणजे ती पक्षाची भूमिका नव्हे. सगळ्यांना एकत्र करून आम्ही पुढे जाणार आहोत. जर मित्रपक्षाशी चर्चा करायची असेल तर मी त्यांना भेटेन असेही त्यांनी नमूद केले.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माझे दाैरे धैर्यशील माने यांना देखील माहित नव्हते. त्यांच्या मतदारसंघात मी फिरलो आहे. धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुणीही मित्रपक्ष उमेदवारी बद्दल बोलले नाहीत. कोल्हापुरातील ठाकरे गटातील अनेक नेते आमच्यासोबत येण्यास इच्छुक आहेत. मला भेटून सुद्धा गेले आहेत असा दावा पाटील यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

pandurang patil says  kolhapur uddhav thackeray faction karykarta wish to enter shiv sena
Kolhapur News : कोल्हापूरकरांनो! पाणी जरा जपून वापरा, राधानगरीसह काळम्मावाडी धरणातील पाणीसाठ्यात हाेतेय घट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com