Satara Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंच्या भेटीनंतर गिरीश महाजन शिवेंद्रराजेंच्या दारी, भेटीत स्पष्टच सांगितलं (video)

Satara : सातारा लाेकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड दाै-यात केला. या जागेवर पुन्हा राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसलेंना निवडणुक लढायची असल्याने महायुतीत उमेदवारीचा तिढा वाढला आहे.
shivendraraje bhosale says bjp should contest from satara lok sabha constituency girish mahajan
shivendraraje bhosale says bjp should contest from satara lok sabha constituency girish mahajan saam tv
Published On

Shivendraraje Bhosale Latest Marathi News :

सातारा जिल्ह्यात भाजपची (bjp satara) ताकद वाढलेली आहे. यामुळे सातारा लाेकसभा मतदारसंघ (satara lok sabha constituency) हा भाजपकडे राहिला पाहिजे अशी भावना आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (mla shivendraraje bhosale) यांनी ग्रामविकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन (bjp leader girish mahajan) यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान उमेदवारी काेणाला द्यावी या सर्वस्वी निर्णय पक्षाचा असल्याचेही राजेंनी स्पष्ट केले. लाेकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) अनुषंगाने ग्रामविकास मंत्री महाजन हे आज (साेमवार) सातारा दाै-यावर आले हाेते. दाेन्ही राजेंची भेट घेतल्यानंतर महाजन यांनीही माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

मंत्री महाजन म्हणाले आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले (mp udayanraje bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. सातारा लोकसभेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही भेट हाेती. हाच लोकसभा मतदारसंघ नव्हतं पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघाची काय परिस्थिती आहे हे मी मतदारसंघात जाऊन भेट घेत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले लाेकसभेसाठी इच्छुक नाहीत असेही महाजन यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

shivendraraje bhosale says bjp should contest from satara lok sabha constituency girish mahajan
Lok Sabha Election 2024 : नारायण राणेंच्या भेटीनंतर 'ओम गणेश' वर किरण सामंत यांचे महत्त्वपूर्ण विधान

साता-याची जागा भाजपकडे घ्यावी : शिवेंद्रराजे

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करताना सातारा लाेकसभा मतदारसंघ हा भाजपकडे राहिला पाहिजे असं त्यांना सांगितलं आहे. सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढलेली आहे.

त्यामुळे भाजपला ही जागा मागावी यासाठी वरिष्ठांपर्यंत (दिल्लीस्तरावर) निरोप पोहोचवा याविषयी मी बोललो आहे असे राजेंनी स्पष्ट केले. भाजपकडून तिकीट कोणाला मिळावं याविषयी माझे बोलणं झालेले नाही. मात्र उमेदवार भाजपचा असावा अशी मागणी मी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

shivendraraje bhosale says bjp should contest from satara lok sabha constituency girish mahajan
ICAI CA May 2024 Exams Postponed: लोकसभा निवडणुकांमुळे सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात माेठा बदल, मंगळवारी हाेणार जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com