Kolhapur News : कोल्हापूरकरांनो! पाणी जरा जपून वापरा, राधानगरीसह काळम्मावाडी धरणातील पाणीसाठ्यात हाेतेय घट

उन्हाळा वाढत जाणार आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आवश्यकता भासल्यास पुढील महिन्यापासून उपसा बंदी करण्याची शक्यता आहे.
51 percent water storage in radhanagari dam kolhapur news
51 percent water storage in radhanagari dam kolhapur news Saam Tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

कोल्हापूरकारांनो! पाणी जरा जपून वापरा अशी जागृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण ही तसेच आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात (water storage in radhanagari dam) आणि काळम्मावाडी धरणातील (kalammawadi dam) पाण्याच्या साठ्यात घट होत आहे. या दाेन्ही धरणांमध्ये मे महिन्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार राधानगरी धरणात 51.43 टक्के तर काळम्मावाडी धरणात 44.21 टक्के इतका पाणीसाठा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उन्हाळा वाढत जाणार आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आवश्यकता भासल्यास पुढील महिन्यापासून उपसा बंदी करण्याची शक्यता आहे.

51 percent water storage in radhanagari dam kolhapur news
Madha Lok Sabha Constituency : माेहिते पाटील 'माढा'त शिवसैनिकांना करु लागले आपलसं, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना देणार शह?

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये मेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन केलं जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने आणि जपून करावा, असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केलं आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

51 percent water storage in radhanagari dam kolhapur news
Sindhudurg Chipi Airport : चिपी हैदराबाद विमान फेरी रद्द, टेक ऑफ घेण्याच्या तयारीत असताना नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com