Success Story : भंडा-यातील शेतक-याच्या जीवनात पेरुने निर्माण केला गोडवा, 10 लाखांची कमाई

पूर्वी पारंपारीक धानाची शेती करीत होताे. मात्र उत्पादन कमी आणि खर्च जास्त यायचा यामुळे पारंपारिक शेती साेडल्याचे मुटकुरेंनी नमूद केले.
bhandara guava growers earn rs 10 lakh in year success story
bhandara guava growers earn rs 10 lakh in year success storysaam tv
Published On

- शुभम देशमुख

Bhandara News :

पारंपारिक शेतीला बगल देत बागायती शेतीकडे वळलेल्या अरुण मुटकुरे या शेतक-याच्या जीवनात पेरुने गोडवा निर्माण केला. मुटकुरे यांनी दीड एकर शेतात पेरूची लागवड (guava farming) करीत लाखोंचे उत्पन्न कमावले. त्यांची शेती पाहण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकरी देव्हाडीत येऊ लागलेत. (Maharashtra News)

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील प्रगतीशील शेतकरी अरुण मुटकुरे हे पूर्वी पारंपारीक धानाची शेती करीत होते. मात्र त्यांना उत्पादन कमी आणि खर्च जास्त यायचा. त्यामुळे मुटकुरे यांनी खचून न जाता व टोकाचे पाउल न उचलता कृषी विभागाचा सल्ला घेत तसेच इतर शेतकऱ्यांचा सल्ला घेत पारंपरिक धान शेतीला 2019 पासून तिलांजली दिली.

bhandara guava growers earn rs 10 lakh in year success story
Raigad Fort : हिरकणी कड्यावर अडकलेल्या साता-यातील युवकाची मित्रासह मृत्यूच्या दाढेतून सुटका

मुटकुरे यांनी बागायती शेतीचा निर्णय घेतला. त्यांनी तीन एकर शेतीतून फक्त दीड एकर शेतात व्ही.एन.आर.वाणाच्या जवळपास सातशे पेरूच्या झाडांची लागवड करीत एका वर्षात तब्बल दहा लाख रूपयांचे उत्पन्न घेतले. त्यांना यासाठी 5 लाख रुपये खर्च आला. तर 5 लाख रुपये नफा त्यांना झाल्याचे अरुण मुटकुरे यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

bhandara guava growers earn rs 10 lakh in year success story
Nandurbar News : १ लाख ७० हजार हेक्टर मधील 'हसदेव' जंगलाची वृक्षताेड थांबवा : ट्रायबल फोरम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com