Raigad Fort : हिरकणी कड्यावर अडकलेल्या साता-यातील युवकाची मित्रासह मृत्यूच्या दाढेतून सुटका

Shivjayanti 2024 : हिरकणी बुरुज परिसरातुन शॉर्टकटने खाली उतरण्याच्या प्रयत्नांत दोघेही रस्ता भरकटले आणि रायगड किल्ल्यावर एका ठिकाणी धर्मसंकटात सापडले हाेते.
hirkaniwadi villagers saved life of two youth from raigad fort
hirkaniwadi villagers saved life of two youth from raigad fortSaam TV

- सचिन कदम

Raigad News :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (chhatrapati shivaji maharaj jayanti) आज देशभरात माेठा उत्साह आहे. महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवरुन युवा मंडळे आपआपल्या गावात शिवज्याेत घेऊन परतत आहेत. दरम्यान शिवजयंती दिनी किल्ले रायगडावरील (raigad fort) हिरकणी कड्यावर (hirkani buruj) अडकलेल्या दाेन युवकांना हिरकणी वाडीतील ग्रामस्थांनी सुखरुप गावात आणले. (Maharashtra News)

शिवजयंती निमित्त किल्ले रायगडावर अनेक जण आले आहेत. या किल्ल्यावर हिरकणी बुरुज आहे. या बुरुजावरुन दोन युवकांनी किल्ला उतरण्याचा प्रयत्न केला. अत्यंत अवघड अशा कड्यावरुन उतरताना हे दाेन्ही युवक एका ठिकाणी अडकून पडले. त्यांना किल्ल्यावर देखील जाता येत नव्हते आणि किल्ल्यावरुन खाली उतरता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी एका दगडाचा आधार घेत तेथेच थांबणे पसंत केले.

hirkaniwadi villagers saved life of two youth from raigad fort
Udayanraje Bhosale : शिवजयंती दिनी उदयनराजे भाेसलेंनी लाेकसभेचे फुंकले रणशिंग, स्पष्टच सांगितलं (पाहा व्हिडिओ)

आज (साेमवार) सकाळी रोप वेच्या मार्गावरून जाताना स्थानिकांनी या युवकांना अडकलेल्या युवकांना पाहिले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. दोघेही कड्यावर अडकल्याचे समजताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. रायगडाच्या हिरकणी कड्यावर अडकलेल्या दोन्ही युवकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टिम दाखल झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दाेन्ही युवकांना हिरकणी वाडीतील स्थानिकांनी सुखरूप किल्ल्यावरुन खाली आणले. या युवकांच्या डाेळ्यात आनंश्रु हाेते. यातील एक सातारा (satara) येथील तर दुसरा उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) आहे. हे दाेघे पुणे येथे नोकरीस आहेत. हे दोघे किल्ले रायगड येथे फिरायला आले होते. हिरकणी बुरुज परिसरातुन शॉर्टकटने खाली उतरण्याच्या प्रयत्नांत दोघेही रस्ता भरकटले आणि किल्ल्यावर अडकले हाेते. स्थानिकांनी त्यांना संकटातून बाहेर काढल्याने त्यांच्या जिवात जीव आला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

hirkaniwadi villagers saved life of two youth from raigad fort
वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचा राज्य सरकारला 5 मार्चपर्यंतचा अल्टीमेटम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com