Santosh Deshmukh killed case accused Sudarshan Ghule confessed  Saam Tv News
महाराष्ट्र

Sudarshan Ghule : 'देशमुखांची हत्या आम्ही केली', तोंडावर लघुशंका, छातीवर उडी; सुदर्शनने सांगितलं प्रतीक घुलेचं राक्षसी कृत्य

Santosh Deshmukh Murder Sudarshan Ghule Confesses : सरपंच संतोष देशमुख हत्येवेळी प्रतीक घुलेने केलेलं किळसवाणं कृत्य सुदर्शन घुलेच्या जबाबातून समोर आलंय. संतोष देशमुखांचं अपहरण ते हत्या हा घटनाक्रम कसा होता?

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टीव्ही

बीड : एका हैवानालाही लाजवेल अशा क्रुर पद्धतीने सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणारा हा राक्षस आहे सुदर्शन घुले. अपहरण, राक्षसी अत्याचार, सलग अडीच तास मारहाण एवढंच नाही तर संतोष देशमुखांना उघडं करुन मारल्याची कबुली सुदर्शन घुलेने दिलीय. या क्रूर कृत्याचा कळस म्हणजे प्रतीक घुलेने संतोष देशमुखांच्या तोंडावर लघवी करुन माणुसकीला काळीमा फासल्याचंही घुलेनं निर्लज्जपणे कबुल केलंय. नेमकं सुदर्शन घुलेने सीआयडीला काय जबाब दिलाय? पाहूयात.

चाटेला कॉल, घुलेची कबुली

9 डिसेंबर देशमुखांची गाडी येताच गाडीची काच फोडून त्यांना बाहेर खेचलं

गॅस पाईपने मारहाण करत उमरी टोलवरुन अपहरण

देशमुखांना टाकळी शिवारात नेऊन मारहाण

जयरामच्या फोनवरुन विष्णू चाटेला 2 वेळा फोन

छातीवर उडी मारल्याने देशमुखांना रक्ताची उलटी

मारहाणीनंतर अंधार होईपर्यंत तुरीच्या शेतात लपून

देशमुखांचा मृत्यू झाल्याचा संशय, मृतदेह दैठणे फाटा येथे टाकून पसार

एवढंच नाही क्लच वायर, गॅस पाईप, प्लास्टिक पाईप, लाकडी काठी, रॉड अशा हत्यारांनी मारहाण केल्याचं नराधम सुदर्शन घुलेनं सांगितलंय. तर वाल्मिक कराडने सांगितल्या प्रमाणे आडवा येईल त्याला आडवा करा, याचं तंतोतंत पालन केल्याचंही घुलेनं म्हटलंय..एवढच नाही तर देशमुखांची हत्या करताना विष्णू चाटे धनंजय देशमुखांना तुमचा भाऊ परत येईल, असं आश्वासन देत असल्याचंही समोर आलंय. मात्र सुदर्शन घुलेने विष्णू चाटेला फोनवर काय सांगितलं? घुलेच्या फोननंतर विष्णू चाटेने कराडला फोन केला का? याचीही माहिती समोर यायला हवी. एवढंच नाही तर देशमुखांची क्रुर हत्या करणाऱ्या गिधाडांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या हैवानांना फासावर लटकवणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HIV Injection Attack : लगीन मोडल्यामुळे संतापला, तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही इंजेक्शन; वाचा सविस्तर

Trending Hairstyles: अस्सल मराठमोळा थाट! पैठणी साडीवर ट्राय करा 'या' 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल्स

Shocking News: लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकला, पाहुण्याचा तडफडून मृत्यू

Viral Video: केस ओढले, लाथा बुक्क्यांनी मारहाण अन्....; विद्यापीठात विद्यार्थिनींचा राडा

Amruta Khanvilkar : नऊवारी पैठणी, हातात हिरवा चुडा अन्...; नव्या नवरीसारखी नटली अमृता खानविलकर, फोटोवरून नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT