Nashik Crime : जास्त किंमतीने सिगरेट का विकतो? टपरीची नासधूस, १ रुपयासाठी राडा, अपंग मालकाने जीवच घेतला; नाशिक हादरलं

Nashik CIDCO Murder News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अपंग टपरीचालकाने एका मद्यपी युवकाची हत्या केलीय. काठीने बेदम मारहाण करुन अतिरक्तस्त्राव झाल्याने त्या युवकाचा मृत्यू झाला आहे.
Nashik CIDCO Murder News
Nashik CIDCO Murder NewsSaam Tv News
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आलीय. केवळ एका रुपयासाठी एका व्यक्तीचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सिडकोच्या छत्रपती संभाजी स्टेडियम परिसरामध्ये समोर आलाय. जास्त किंमतीने सिगरेट का विकतो? असा जाब विचारून मद्यपी ग्राहकाने टपरीतील साहित्याची नासधूस केल्याच्या रागातून टपरी चालकाने काठीने केलेल्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू झाला.

सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमच्या पाठीमागील बाजूला रस्त्याच्या कडेला अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे यांची टपरी आहे. आज बुधवारी दुपारी एक मद्यपी ग्राहक सिगरेट पिण्यासाठी टपरीवर आला. यावेळी १० रुपयांची सिगरेट ११ रुपयांना का दिली? याचा जाब विचारून ग्राहकाने टपरी चालकाच्या टपरीतील साहित्याची नासधूस करत शिवीगाळ केली. याचा राग आल्यानं टपरी चालकाने ग्राहकाला काठीच्या सहाय्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत ग्राहकाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. विशाल भालेराव असं मृत्यू झालेल्या ग्राहकाचं नाव असून मारहाणीच्या या घटनेत यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, पोलिसांनी टपरी चालक बापू सोनवणे याला ताब्यात घेतलंय.

Nashik CIDCO Murder News
Pune News : एकाच रंगाचे कपडे, जनावरांचा बळी देण्यास बंदी; एकविरा देवीच्या यात्रेनिमित्ताने प्रशासनाचा मोठा निर्णय

सासरच्यांनी घरातून हाकललं; नवविवाहितीने संपवलं आयुष्य

नाशिकच्या देवळामध्ये नवविवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. हा त्रास सहन न झाल्यामुळे अंबिका मयूर पवार या महिलेने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना देवळा शहरातील इंदिरा नगरमध्ये घडली. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका मयूर पवार या विवाहितीने आत्महत्या केली. सात महिन्यांपूर्वीच अंबिकाचे लग्न झाले होते. पण लग्नानंतर सासरची मंडळी तिचा छळ करू लागले. बाईक घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी अंबिकाचा पती, सासू, सारे आणि नणंद तिला त्रास देत होते. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अंबिकाने आत्महत्या केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अंबिकाच्या नवरा, सासू, सासरे आणि नणंद या चौघांना अटक केली.

Nashik CIDCO Murder News
IPL 2025 GT vs RCB: कोहलीचा फ्लॉप शो! परदेशी खेळाडूंनी वाचवली लाज; लिव्हिंगस्टन आणि टीम डेव्हिडची तुफानी फलंदाजी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com