Pune News : एकाच रंगाचे कपडे, जनावरांचा बळी देण्यास बंदी; एकविरा देवीच्या यात्रेनिमित्ताने प्रशासनाचा मोठा निर्णय

Pune Ekvira Devi Yatra : लोणावळ्यातील एकविरा गडावर हिंदू नववर्षाच्या शुभ महूर्तावर आई एकविरा देवीच्या मुख्य मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Karla Ekvira Devi Yatra Administration Orders
Karla Ekvira Devi Yatra Administration OrdersSaam Tv News
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : श्री. एकविरा देवी चैत्री उत्सव २०२५ पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी ३० मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशान्वये वरील कालावधीत शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके, वाद्ये, ढोल, ताशे, वाजविण्यास व गडावर नेण्यास बंदी करण्यात येत आहे. एकाच प्रकारची व रंगाची कपडे, वेशभूषा परिधान करणे, विशेषत: टी शर्ट वापरणे, कोंबडे, बकरे, पशु, पक्षी यांचा बळी देणे व त्यांना मंदिरावर सोडणे, कार्ला लेणी व परिसरातील ऐतिहासिक वास्तु व शिल्पांना हानी पोहचविणे अथवा विद्रुपीकरण करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ मधील तरतुदी व प्रचलित कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

Karla Ekvira Devi Yatra Administration Orders
Maharashtra Rain : राज्यावर संकट! अवकाळी पावसाने झोडपलं, उन्हाळी पिकांना मोठा फटका; बळीराजाला रडवलं

दरम्यान, लोणावळ्यातील एकविरा गडावर हिंदू नववर्षाच्या शुभ महूर्तावर आई एकविरा देवीच्या मुख्य मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. आजपासून कार्ला एकविरा गडावर चैत्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. चैत्र नवरात्री चा आजचा पहिला दिवस असल्याने भाविकांची मांदियाळी देखील कार्ला एकविरा गडावर दिसून येत आहे.

Karla Ekvira Devi Yatra Administration Orders
Nagpur Crime : ये बाहेर निघ...; कार रिव्हर्स घेताना बाईकला धडक, पोलीस कर्मचाऱ्याची काचा फोडत कपलला शिवीगाळ; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com