महाराष्ट्र

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, कंटेरनरच्या धडकेत जीपचा अक्षरश: चक्काचूर, ३ जण गंभीर जखमी

Beed Accident news : बीडमध्ये भीषण अपघाताची थरारक घटना घडली आहे. कंटेरनरच्या धडकेत जीपचा अक्षरश: चक्काचूर झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विनोद जिरे

बीड : राज्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा अपघाताची भीषण घटना घडली आहे. बीडमधील धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही अपघाताची घटना घडली आहे. कंटेनर आणि जीपच्या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे भरधाव जाणारी जीप दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कंटेनरला धडकली. या झालेल्या भीषण अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. बीडच्या गेवराई शहराजवळील बायपासवर ही घटना घडली आहे.

या अपघातात जीपचा चक्काचूर झाला आहे. अपघातामधील गंभीर जखमींना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामधील जखमी लातूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे

अपघात नेमका कसा झाला?

छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे भरधाव वेगाने जीप जात होती. यावेळी जीपवरील चालकाचं नियंत्रण सुटले. त्यानंतर गेवराई बायपासजवळ जीप दुभाजकावरील झाडे तोडून कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी करत जखमींना बीडच्या शासकीय रुग्णालय दाखल केले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलीस कर्मचारी दीपक लंके, पोलिस उपनिरीक्षक डॉ. शिवाजी भुतेकर, धन्यपाल लोखंडे यांच्यासह अनेकांनी धाव घेतली. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी धाव घेत वाहतूक कोंडी सुरळीत केली.

पुण्यातील वाघोलीत टँकरचा अपघात

पुण्यातील वाघोली परिसरात असणाऱ्या राजेश्वरी नगरी बकोरी येथे टँकरचा अपघात झाल्याची घटना घडली. शुक्रवारी झालेल्या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोसायटीमध्ये राजरोसपणे टँकर चालक वेगाने टँकर चालवत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

सोसायटीत वळत असताना टँकरचा अपघात झाल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे. चालकाचा ताबा सुटल्यानंतर टँकरचा अपघात झाला आहे. या अपघातानंतर सोसायट्यांमध्ये स्पीड ब्रेकर बसावेत, अशी मागणी सोसायटी करत आहे. यापूर्वी टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT