Ladki Bahin Yojana  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana :...म्हणून लाडकी बहीण योजना सुरु केली; बच्चू कडू यांनी डागली महायुतीवर तोफ

bacchu kadu on Ladki Bahin Yojana : बच्चू कडू यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारला लक्ष्य केलं आहे. अमरावतीत अन्नत्याग आंदोलनादरम्यान बच्चू कडूंनी टीका केली.

Vishal Gangurde

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावती : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून महायुतीला लक्ष्य केले जात आहे. एकनाथ खडसे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत आल्याचा दावा केला. त्यानंतर आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी मत विकायला लाडकी बहीण योजना सुरु केल्याची टीका सरकारवर केली आहे. अमरावतील अन्नत्याग आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

अमरावतीत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. गुरूकूज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीला अभिवादन करून बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु झाली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगाना ६ हजार रुपये मानधन, शेतमजूर, मच्छीमार यासह विविध घटकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन सुरु केलं आहे.

बच्चू कडू यांच्या भाषणातील मुद्दे

देशातील शेतकरी नेते राकेश टिकेत उद्या येणार आहे. देशात आता जातीय रंग देण्याचा काम केलं जातंय. राज्यात मराठा आणि ओबीसी वाद पेटवला गेला. त्यामुळे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न मागे पडत चालला आहे.

आमच्या डोक्यात हिंदू-मुस्लिम टाकत आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणजे बच्चू कडूंचे आंदोलन आहे. वेळ आली तर बच्चू कडू बलिदान करायला तयार आहे. पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. बाप मेला तरी चालेल, पण नेता जिवंत राहिला पाहिजे. ही व्यवस्था मोडून काढायची आहे.

आमच्या बियाण्यांचे भाव का कमी झाले नाही. तुरीचे भाव कमी करायचे आहे. महायुतीने मत विकायला लाडकी बहीण सुरू केली. त्याच वेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडले आहे. सरकार सत्तेवर यासाठी लाडकी बहीण आणते. त्यावेळी मात्र शेतकऱ्यांचे मालाचे भाव पाडले. सरकारला माहीत आहे. बच्चू कडू मेला तरी फरक पडत नाही. कारण जाती धर्मात लोकांना गुंतवणूक ठेवले आहे.

राज्यात आमदाराचा पगार थांबला नाही. कर्मचाऱ्याचा पगार थांबला नाही, पण दिव्यांगाचे पगार सहा-सहा महिने थांबले आहे. बच्चू कडू आणि त्यांचा कार्यकर्ता जिवंत आहे. बच्चू कडू बैठने वाली औलाद नही है.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT