Mahayuti : महायुती फुटली? नवी मुंबईत शिवसेनेचं एकला चलो, अमरावतीमध्ये भाजप स्वबळावर

Local body Election maharashtra : महायुतीतील मतभेद समोर आले आहेत. नवी मुंबईमध्ये शिवसेना स्वबळावर, तर अमरावतीमध्ये भाजपने स्वतंत्र निवडणुकीची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीत फूट पडली का?
Local body Election maharashtra
Local body Election maharashtraSaam TV News
Published On

Navi Mumbai elections, Amravati municipal polls : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका सप्टेंबर अथवा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर राजकीय पक्षाने निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. सत्ताधारी महायुती (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदे यांनी सांगितलेय. पण काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी तयारीवर जोर दिला आहे, तर शिवसेनेने रणनीती आखली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आणि अमरावती दोन्ही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी नवी मुंबईत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनीही अमरावाती महापालिकामध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केलेय. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुती एकमेकांसमोर उभे राहणार असल्याचे चित्र दिसतेय.

Local body Election maharashtra
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा मोठा झटका; एकीकडं राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार, दुसरीकडं महायुती फुटली!

नवी मुंबईत शिवसेनेचे एकला चलो रे

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. तुम्ही आमच्या सोबत आलात तर युती म्हणून निवडणूक लढवू, नाहीतर तुम्ही स्वबळावरची भाषा केली तर आम्ही सुद्धा स्वतंत्रपणे भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहोत, असा इशारा खासदार नरेश मस्के यांनी भाजपला दिलाय.

नवी मुंबई फक्त दिसायला ताजमहाल आहे, पण प्रत्यक्ष अनेक समस्या आहेत असा टोला सुद्धा नरेश मस्के यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे. युवा सेनेत जाहीर मेळाव्यात खासदार नरेश मस्के यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

Local body Election maharashtra
Sanjay Raut : देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा गौप्यस्फोट, ठाकरे-पवारांमुळे मोदी-शाहांची अटक टळली, वाचा सविस्तर

अमरावतीत भाजपचा स्वबळाचा नारा -

भाजप नेत्या नवनीत राणा यांनी मोठं विधान करत अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या, "अमरावती महानगरपालिकेवर भाजपचं महापौर बसेल." याप्रसंगी अमरावती भाजप शहर जिल्हाध्यक्षपदी नितीन धांडे यांची नियुक्ती झाली. भाजप कार्यालयात आयोजित पदग्रहण समारंभात नवनीत राणा यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. राणा यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने निवडणूक लढण्याचे आवाहन केले. पक्षाने स्थानिक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com