Virat Kohli : बेंगळुरु चेंगराचेंगरीसाठी विराट जबाबदार; पोलिसांत गुन्हा, किंग कोहलीचं टेन्शन वाढलं

Virat Kohli News : बेंगळुरु पोलिसांनी विराट कोहलीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अडचणीत भर पडली आहे.
Virat Kohli
Virat Kohli news Saam Tv
Published On

आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर ४ जून रोजी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी झाली होती. चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे आनंदाचं वातावरण दु:खात बदललं होतं. या प्रकरणी आरसीबीच्या ४ अधिकाऱ्यांना ६ जून रोजी सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर आता विराट कोहलीच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

क्रिकेटपटू विराट कोहली विरोधात कब्बन पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच. एम. वेंकटेश यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेत तपास केला जाईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. विराट कोहली हा चेंगराचेंगरी जबाबदार असल्याचा वेंकटेश यांचा आरोप आहे. विराट कोहलीवर गुन्हा नोंदवल्याने स्टार खेळाडूचं टेन्शन वाढलं आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने विराट कोहलीला कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.

Virat Kohli
Maharashtra Politics : दोन टॉमी अन् एक मामी; महायुतीतील राजकारण पेटलं, कार्यकर्त्यांची वादग्रस्त पोस्ट

पंजाब किंग्सच्या विरोधात आरसीबीने चांगलं प्रदर्शन करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. आरसीबीने आयपीएलमध्ये १७ वर्षांनी ट्रॉफी जिंकली. आयपीएल २०२५ चा चषक जिंकल्यानंतर आरसीबीचा १७ वर्षांचा दुष्काळ संपला. याच पार्श्वभूमीवर ४ जून रोजी बेंगळुरूत विजयी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Virat Kohli
Bakra Eid 2025 : बकरी ईदच्या दिवशी पशूहत्यावर बंदी; दिल्ली सरकारने तातडीने घेतला मोठा निर्णय

विजयी रॅलीत आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी लाखो चाहते स्टेडियमजवळ आले होते. ३५ हजार क्षमतेच्या स्टेडियमजवळ लाखो लोक आले होते. मात्र, ही रॅली सुरु होण्याआधीच चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक जखमी झाले. कर्नाटक सरकारने मृतकांच्या नातेवाईकांना १०-१० लाख रुपये आर्थिक सहाय्य केले. कर्नाटक सरकारच्या घोषणेनंतर आरसीबीनेही मृतांच्या नातेवाईकांना १०-१० लाख रुपयांची घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com