nashik News
nashik politics Saam tv

Maharashtra Politics : दोन टॉमी अन् एक मामी; महायुतीतील राजकारण पेटलं, कार्यकर्त्यांची वादग्रस्त पोस्ट

nashik politics : नाशिकमध्ये महायुतीतील राजकारण पेटलं आहे. कार्यकर्त्यांच्या वादग्रस्त पोस्टनंतर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Published on

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे नाशिकमधील राजकारण तापलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध दर्शवला आहे. सीमा हिरे यांच्या विरोधातनंतर बडगुजर यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली आहे. यानंतर अंबड पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नाशिकमध्ये महायुतीतील अंतर्गत राजकारण तापलंय. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे कार्यकर्त्यांमधील वाद उफाळला आहे. नाशिकच्या पश्चिम विधानसभामधील सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे यांच्यातील वाद वाढला आहे. ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेदरम्यान बडगुजर यांच्या समर्थकांनी वादग्रस्त पोस्ट केली. यावरून दोन्ही गटात तणाव वाढला आहे.

nashik News
Ladki bahin yojana :...तरच 'लाडकी'चा हप्ता बँक खात्यात जमा होणार; महत्वाची माहिती आली समोर, पाहा व्हिडिओ

बडगुजर यांच्या समर्थकांच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टनंतर अंबड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या पोस्टमध्ये तीन कुत्रे आहेत. तसेच मराठी कॅप्शनमध्ये दोन टॉमी आणि एक मामी असा उल्लेख करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील ही पोस्ट भाजप आमदार सीमा हिरे यांना उद्देशून टाकल्याने पोलिसांत तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वादग्रस्त पोस्ट प्रकरणी अंकुश शेवाळे, गणेश दराडे आणि धीरज राजपूत या तिघांविरोधात नाशिकच्या अंबड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या पोस्टवर आमदार सीमा हिरे यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

nashik News
Pune Fire : पुण्यात इमारतीला भीषण आग; चौघींनी घाबरून बाल्कनीतून मारल्या उड्या

नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग

ठाकरे गटाचे नाशिकमधील सर्व प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर प्रथमच नाशिकमधील नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. सुधाकर बडगुजर यांच्या जागी दत्ता गायकवाड यांची शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी करण्यात नियुक्ती आली आहे.

nashik News
Hasan Mushrif News : ईडीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफ नॉट रिचेबल, पाय आणखी खोलात? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

या नियुक्तीनंतर उपनेते दत्ता गायकवाड यांच्यासह जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी, वसंत गीते, सुनील बागुल आणि अन्य नेते मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे नाशिकमधील या नेत्यांशी काय चर्चा करतात आणि काय आदेश देतात, याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com