Shocking : खळबळजनक! माजी IPS अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Shocking incident : माजी IPS अधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. त्यांचा घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला.
Former IPS officer killed
Shocking incident :saam tv
Published On

बेंगळुरूत एक खळबळजनक घटना घडली आहे. कर्नाटकातील माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. ओम प्रकाश यांचा राहत्या घरात मृतदेह आढळला आहे. ओम प्रकाश हे १९८१ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांचा घरातच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळलाय.ओम प्रकाश यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांना सशंय आहे की, त्यांचा हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं आहे. ओम प्रकाश यांच्या मृत्यू प्रकरणात संशयाची सुई त्यांच्या पत्नीवर आहे. घटनेवेळी त्यांची बायको आणि मुलगी घरात होत्या.

Former IPS officer killed
Shirish Valsangkar : न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

प्राथमिक माहितीनुसार, ओम प्रकाश यांची पत्नी कथित हत्या प्रकरणात मुख्य आरोपी होऊ शकते. पोलिसांना त्यांच्या बायकोला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून बारकाईने चौकशी सुरु आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Former IPS officer killed
Shocking : ७ वर्षांचं प्रेम क्षणात आटलं; सरकारी नोकरी लागताच बायकोने रंग दाखवला, इंजिनीअर नवऱ्याने टोकाचं पाऊल उचललं

बेंगळुरु शहर पोलिसांनी म्हटलं की, 'कर्नाटकातील माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश हे १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेची संपूर्ण माहिती हाती आलेली नाही. पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Former IPS officer killed
Wadala Clash : वडाळ्यात शोभायात्रेआधीच राडा; विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलीस भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

नेमकं काय घडलं?

ओम प्रकाश बेंगळुरूतील एका घरात राहत होते. त्यांचा रविवारी घरात मृतदेह आढळला. सुरुवातीच्या तपासात माहिती समोर आले की, 'घटनेवेळी घरात त्यांची पत्नी आणि मुलगी होती. त्यांच्या शरीरावर जखमा आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या पत्नीने पोलिसांना फोन करून ओम प्रकाश यांच्या हत्येची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनेस्थळी पोहोचले.

पोलिसांनी सांगितलं की, 'ओम प्रकाश यांचा मृतदेह घरात पडलेला होता. घटनेवेळी पत्नी आणि मुलगी घरात होत्या. पोलिसांकडून पत्नीची चौकशी केली जात आहे. ओम प्रकाश यांच्या हत्येमागे घरगुती वादाचं कारण असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com