Kalyan Police : अनेक महिन्यांपासून गुंगारा देणारा ड्रग्स माफिया ताब्यात; कल्याण डीसीपी स्कॉडची कारवाई

Kalyan News : पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्याजवळ विक्री करिता आणलेले १५ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी हाशमी याला ताब्यात घेतले
Kalyan Police
Kalyan PoliceSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: गेल्या अनेक महिन्यांपासून हाशमी हा पोलिसांना गुंगारा देणारा ड्रग्स माफियाला कल्याणच्या डीसीपी स्कॉडने ताब्यात घेतले आहे. कल्याण जवळील आंबिवली इराणी वस्तीत राहणारा ड्रग्स माफिया हाशमी जाफरी याला सापळा रचत बेड्या ठोकल्या. त्याच्या जवळून १५ ग्रॅम वजनाचा मेफॅट्रॉन एमडी ड्रग्स हस्तगत करण्यात आला आहे. 

कल्याणच्या आंबिवली परिसरात राहणारा हाशमी जाफरी हा सराईत गुन्हेगार आहे. कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याविरोधात कारवाई मोहीम सुरू आहे. याच दरम्यान डीसीपी स्कॉडला हाशमी जाफरी हा कल्याण बंदरपाडा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या बंदरपाडा परिसरात सापळा रचला. 

Kalyan Police
Kalyan Dombivali : कल्याणच्या सहजानंद चौकात वाहतूक कोंडी थांबणार; केडीएमसीकडून फिरता ट्रॅफिक सिग्नलचा प्रयोग

१५ ग्रॅम ड्रग्स आढळले 

याच दरम्यान हाशमी जाफरी हा एका स्कुटीवर आला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्याजवळ विक्री करिता आणलेले १५ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्स आढळून आले. यानंतर पोलिसांनी तत्काळ हाशमी याला ताब्यात घेतले आहे. तर त्याने एमडी ड्रग्स कोठून आणला आणि कोणाला विकला आहे; याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 

Kalyan Police
Pune Bhor News : निरा खोऱ्यातील धरणात गतवर्षीपेक्षा मुबलक पाणीसाठा; उन्हाळ्यात पाणी तुटवड्याची चिंता नाही

यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई 

दरम्यान हाशिम याच्या विरोधात या आधी देखील हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याच्या विरोधात मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती. आता त्याच्या विरोधात ड्रग्स तस्करीसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com