Pune Bhor News : निरा खोऱ्यातील धरणात गतवर्षीपेक्षा मुबलक पाणीसाठा; उन्हाळ्यात पाणी तुटवड्याची चिंता नाही

Pune News : गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणात पाणीसाठा चांगला झाला आहे. यामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यात देखील धरणात एप्रिल महिन्याच्या मध्यात देखील धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे
Pune Bhor News
Pune Bhor NewsSaam tv
Published On

सचिन जाधव

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या निरा खोऱ्यातील चार साखळी धरणांमध्ये यंदा मुबलक असा पाणीसाठा शिल्लक आहे. या चारही धरणांमध्ये मिळून एकूण १७.७० टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी १३.०३ टीएमसी पाणीसाठा होता. अर्थात गत वर्षीपेक्षा ४.६७ टीएमसी अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याने या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांना यंदा पाण्याची चिंता नाही. 

भोर तालुक्यातील नीरा खोऱ्यातील धरणांमधला हा पाणीसाठा पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यासाठी तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरससह इतर भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा आहे. गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणात पाणीसाठा चांगला झाला आहे. यामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यात देखील धरणात मुबलक असा पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. 

Pune Bhor News
Yawal : आईजवळ झोपलेल्या चिमुकलीवर बिबट्याची झडप; शीर केले धडावेगळे, परिसरात घबराट

पाण्याचा तुटवडा नाही 
सध्या भाटघरमध्ये ७.६१, नीरा देवघर ३.१०, वीर ५.४८ तर गुंजवणीमध्ये १.४९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. धरणातील पाण्याची स्थिती ठीक असल्याने उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिक समाधानी आहेत. तर १५ जूलैपर्यंत चारही धरणामध्ये १.५० टीएमसी पाणी पिण्यासाठी तसेच पंढरपूर यात्रेसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. 

Pune Bhor News
Kalyan Dombivali : कल्याणच्या सहजानंद चौकात वाहतूक कोंडी थांबणार; केडीएमसीकडून फिरता ट्रॅफिक सिग्नलचा प्रयोग

निरा डाव्या कालव्यावर पुणे जिल्ह्यातील ३७ हजार ७० हेक्टर तर उजव्या कालव्यावर सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ५०६ हेक्टर असे नीरा प्रणालीवर पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील एकूण १ लाख २ हजार ५७६ हेक्टर प्रकल्पीय सिंचन क्षेत्र आहे. यासाठी भाटघरमधून दोन हजार ११० क्यूसेक्स, तर नीरा देवघरमधून ७५० क्यूसेक्स, गुंजवणीमधून २५० क्युसेक्सने कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com