Achalpur Assembly Election exit poll results 2024 : महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारांमध्ये सहभागी होणारे प्रहारचे बच्चू कडू यांचं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेय. बच्चू कडू पाचव्यांदा आमदार होणार का ? हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. पण त्याआधी आलेल्या अचलपूर मतदारसंघाच्या एक्झिट पोलमध्ये बच्चू कडू यांचेच पारडे जड असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
बच्चू कडू यांनी सलग चार वेळा अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ ते २०१४ या पाच वर्षांमध्ये बच्चू कडू दोन्ही सरकारमध्ये सहभागी होते. मविआ आणि महायुती सरकारमध्ये सहभागी झालेल्या बच्चू कडू यांनी यावेळी तिसऱ्या आघाडीचा झेंडा हातात घेतला. बच्चू कडू यांचा विजय होईल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. बच्चू कडू यांना पाचव्यांदा अचलपूरमधील चक्रव्यूह भेदण्यात यश आल्याचे एक्झिट पोलच्या आकड्यातून दिसतेय.
अचलपूरमधील तिहेरी लढतीत बच्चू कडू यांचा विजय होईल, असा अंदाज आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात महायुतीकडून प्रवीण तायडे हे भाजपचे नवखे उमेदवार होते. तर भाजपचे हिंदुत्ववादी बंडखोर उमेदवार प्रमोदसिंह गड्रेल यांनी बंडखोरी केली. दुसरीकडे अचलपूर मतदारसंघात लोकसभेला काँग्रेसला मोठं मताधिक्य मिळालं होतं. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पराभवाची चव चाखणारे काँग्रेसचे बबलू देशमुख पुन्हा या मतदारसंघात मैदानात उतरले आहेत. पण एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार, बच्चू कडू पाचव्यांदा आमदार होतील.
अचलपूरच्या नागरिकांनी बच्चू कडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेय. अचलपूरच्या तिहेरी लढतीत, बच्चू कडू विजयी होतील, असा अंदाज एक्झिट पोलचा अंदाज आहे. बच्चू कडू यांनी या मतदारसंघात मोठं काम केलेय. पण हे काम खासदाराच्या निधीमधून झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला होता. पण आपला भिडू बच्चू कडू म्हणत अचलपूरकरांनी बच्चू कडू यांनाच साथ दिल्याचे एक्झिट पोलमधून दिसतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.