Uddhav Thackeray, Navneet Rana SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'ठाकरेंच्या हातात धनुष्यबाण शोभत नव्हता, म्हणून शिंदेंकडे गेला...' नवनीत राणांची खोचक टीका

Ram Mandir Inauguration: राममंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त अमरावतीच्या हनुमान गढीवर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीने 11 लाख लाडूंचा प्रसाद वितरित करण्यात आला.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. २२ जानेवारी २०२४

Amravati Breaking News:

राममंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त अमरावतीच्या हनुमान गढीवर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीने 11 लाख लाडूंचा प्रसाद वितरित करण्यात आला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी कार सेवक म्हणून राणा दाम्पत्याकडून फडणवीसांचा (Devendra Fadanvis) सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद सांधताना राणा दांपत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

आमदार रवी राणांची टीका...

"पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अयोध्येत श्री रामाचे मंदिर उभारले आहे. यानिमित्त आज देशात दिवाळीचे वातावरण आहे. आम्ही 11 लाख लाडूचा 1 लाडू बनवला, असे आमदार रवी राणा (Ravi Rana) यावेळी म्हणाले. तसेच उध्दव ठाकरे यांना धनुष्यबाण पेलत नव्हता. ज्या व्यक्तीमध्ये रामाचे विचार आहे अशा व्यक्ती जवळ श्रीरामाचा धनुष्यबाण असला पाहिजे, म्हणून देवेंद्र फडणवीसांना आम्ही भेट दिला," असा टोलाही रवी राणा यांनी लगावला.

म्हणून धनुष्यबाण शिंदेंकडे गेला..

"हनुमान चालीसा म्हटली म्हणून ज्यांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्या हातात धनुष्यबाण शोभत नव्हता म्हणून तो धनुष्यबाण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जवळ गेला तर फडणवीस यांना देखील धनुष्यबाण देऊन आम्ही त्यांचा सन्मान केला, असेही आमदार रवी राणा पुढे बोलताना म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवनीत राणांचा हल्लाबोल..

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. "उद्धव ठाकरे यांच्या हातात धनुष्यबाण सांभाळत नव्हता म्हणून तो धनुष्यबाण देवाने आधीच काढून घेतला आहे, जो श्री प्रभू राम का नाही वो किसी काम का नही, असे त्या म्हणाल्या. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कार सेवकांचे योगदान काय कळणार बाळासाहेब ठाकरे असते तर निमंत्रणाची वाट त्यांनी पाहिली नसती," अशी टीकाही नवनीत राणा यांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Buldhana : सणासुदीच्या काळात गावात दूषित पाण्याने बाधा; पिंप्री अनेकांना गावात डायरियाची लागण

Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT