Rahul Gandhi: राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखलं, रस्त्यावरच सुरु केलं धरणे आंदोलन; पाहा VIDEO

Bharat Jodo Nyaya Yatra: आसाममध्ये राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. यानंतर ते तिथेच धरणे आंदोलनावर बसले.
Rahul Gandhi Denied Entry In Temple
Rahul Gandhi Denied Entry In TempleSaam Tv

Rahul Gandhi Denied Entry In Temple:

आज राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहेत. यामुळे देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. सर्वत्र फक्त राम नावाचाच गजर ऐकू येत आहे. यातच आज काँग्रेस खासदार राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी आसाममध्ये आहेत.

या यात्रेदरम्यान आसाममध्ये राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. यानंतर ते तिथेच धरणे आंदोलनावर बसले. याचा व्हिडिओही समोर आला आहे. जो सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rahul Gandhi Denied Entry In Temple
IRCTC Ayodhya: श्री रामजन्मभूमी आणि 3 ज्योतिर्लिंगांचे स्वस्तात होणार दर्शन, जाणून घ्या IRCTC टूर पॅकेजची संपूर्ण माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, आसाममध्ये सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी 15 व्या शतकातील आसामी संत आणि विद्वान श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नागाव येथील बटाद्रवा सत्ता मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मंदीरातील प्रशासनाने प्रवेश दिला नाही. राहुल गांधींचा आरोप आहे की, त्यांना मंदिराच्या 15 किलोमीटर आधी थांबवण्यात आले. त्यानंतर ते आपल्या समर्थकांसह तेथेच धरण्यावर बसले. मी असा कोणता गुन्हा केला आहे की. मला मंदिरात जाऊ दिले नाही, असा आदेश वरून आला असावा, असा आरोप गांधी यांनी केला.  (Latest Marathi News)

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी आपल्या समर्थकांसह रस्त्यावर बसलेले दिसत आहेत. यावेळी राहुल गांधींचे सर्व कार्यकर्ते टाळ्या वाजवत 'रघुपती राघव राजा राम' म्हणत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ काही मिनिटांतच 2 लाख 83 हजार लोकांनी पाहिला आहे.

Rahul Gandhi Denied Entry In Temple
Kalyan Local News: पट्टेरी वाघाची कातडी, पिस्तूल तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 42 लाख रुपयांचा ऐवज जप्त

साडेपाच हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलं आहे. व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी राहुल गांधींच्या अहिंसक प्रतिकाराचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेक लोक व्हिडिओमध्ये गायल्या जाणाऱ्या 'राम' भजनाचा संबंध प्राणप्रतिष्ठेशी जोडत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com