पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला.
देशभरात आनंदाचे वातावरण आहे, सर्वांच्या ओठांवर जय श्रीरामाचे नाव आहे. श्री रामजन्मभूमी मंदिराची स्थापना (Ram Mandir Inauguration) फक्त अयोध्येतच नाही तर देशातील इतर राज्ये आणि शहरांमध्ये साजरी केली जात आहे. तुम्हालाही अयोध्येतील श्री रामजन्मभूमीला भेट द्यायची असेल आणि यासाठी तुम्ही बजट फ्रेंडची पर्यायाचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला IRCTC च्या स्वस्त टूर पॅकेजबद्दल सांगणार आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारतीय रेल्वेकडून एक परवडणारे टूर पॅकेज ऑफर केले जात आहे. ज्यामध्ये तुम्हाला अयोध्येतील श्री राम मंदिर (Shri Ram Janmabhoomi) सह 3 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करता येईल. रेल्वेचे हे पॅकेज 9 रात्री 10 दिवसांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला हॉटेल, जेवण, वाहतूक अशा सुविधा अत्यंत कमी दरात मिळणार आहेत. (Latest Marathi News)
रेल्वे अयोध्या आणि प्रयागराजसह 3 ज्योतिर्लिंग दर्शन टूर पॅकेज देत आहे. जे 9 रात्री आणि 10 दिवसांचे किफायतशीर पॅकेज आहे. हा दौरा अहमदाबाद/आनंद/छायापुरी/मेघनगर येथून सुरू होईल. तर तुरीची सुरुवातच अयोध्या, चित्रकूट, नाशिक, प्रयागराज, श्रींगवरपूर, उज्जैन आणि वाराणसी आहे.
ही टूर 5 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. यामध्ये तुम्हाला ट्रेन, बस, हॉटेल, जेवण आणि विमा या सुविधा मिळतील. या पॅकेजची सुरुवातीची किंमत 20,500 रुपये आहे. पॅकेजच्या किंमती वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह बदलतात. याबद्दल जाणून घेऊ...
प्रति व्यक्ती इकॉनॉमी क्लास (स्लीपर) किंमत 20,500 रुपये आहे.
कम्फर्ट क्लासची (3AC) किंमत 33,000 रुपये प्रति व्यक्ती आहे.
सुपीरियर क्लासची (2AC) प्रति व्यक्ती किंमत 46,000 रुपये आहे.
तुम्ही अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या (IRCTC) वेबसाइटला भेट देऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.